Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकज कुमावतांची जुगार अड्ड्यावर धाड, सात लाखाचा मुद्देमाल जप्त तर 22 जुगारी गजाआड


बीड, दि.16 (लोकाशा न्यूज) : सहय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज उपविभागाचा पदभार घेतल्यापासून कारवाईचा धडका सुरुच आहे. गुटखा, जुगार, दारु, वाळू अशा विविध अवैध धंद्यांवर कारवाया सुरुच आहेत. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे गुरुवारी (दि.16) दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे मारले. यावेळी 22 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडी रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या धडाकेबाज कारवायामुळे अवैध धंदे चालकांची धांदल उडाली आहे.

Exit mobile version