Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडमधील अतिथी हॉटेलवर छापा, पंकज कुमावतांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, विदेशी कंपनीची दारू पकडली, एक अटकेत, मुख्य आरोपी पळाला


बीड, शहरातील अतिथी हॉटेल मागच्या काही महिन्यापासून सील केले होते, तरीही विनापरवाना विदेशी दारूची विक्री केली जात होती, याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली, त्यांनी व राज्य उत्पादन शुल्क विभाग बीडचे अधीक्षक नितीन घुले यांनी संयुक्तिक रित्या छापा मारला, यावेळी 91 हजाराची विदेशी दारु जप्त करण्यात आली, तसेच दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बीडमधील अतिथी हॉटेलमध्ये विनापरवाना विदेशी दारूची विक्री केली जात होती,मंगळवारी रात्री या हॉटेलवर छापा मारत विविध विदेशी 91 हजार 765 रुपयांची दारू जप्त करण्यात आली, तसेच गौस सत्तार पठाण यास अटक केली, तर मुख्य आरोपी निखिल सुरेंद्र जयस्वाल हा घटनास्थळावरून फरार झाला, दोघांवरही महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही कारवाई दुय्यम निरीक्षक आर.ए. घोरपडे, ए. एस. नायबळ, जवान आमीन सय्यद, सचिन सांगळे, नितीन मोरे, शहाजी लोमटे, जवान चालक अशोक शेळके यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास घोरपडे हे करत आहेत.

Exit mobile version