अभिजित नखाते, बीड
देशाच्या राजकिय पटलावर मुंडे साहेबांचे नाव अजरामर राहिल अशीच त्यांची कारकीर्द होती, ‘‘मी उतणार नाही, मी मातणार नाही आणि घेतला वसा टाकणार नाही’, खरचं मुंडे साहेबांच्या या चार ओळी प्रत्येकाच्या मनाला लागून जातात, आपल्या उभ्या आयुष्यात त्यांनी या चार ओळीच डोळ्यासमोर ठेवून जनसेवेचं काम केलं, राजकारणात शब्द द्यावे लागतात, असे सातत्याने म्हटले जाते, मात्र राजकारणात शब्द तर द्यावेच लागतात, त्याबरोबरच ते शब्द पुर्णही करावे लागतात, हे खर्या अर्थाने मुंडे साहेबांनी संपूर्ण देशाला आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले. सर्व सामान्य कुटूंबात जन्म घेणार्या आणि पुढे आपल्या कर्तृत्वावर मुंबई आणि दिल्ली काबीज करणार्या याच गोपीनाथरावांनी अनेकांचे संसार उभे केले. लाखो लोकांना न्याय देताना त्यांना पावलो-पावली संघर्ष करावा लागला, अशा संघर्षात एका योध्दाप्रमाणे ते लढले आणि जिंकलेही, अडचण छोटी असो की मोठी एका हकेत धावून येणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणून मुंडे साहेबांची खरी ओळख बनली होती, लोकांच्या मनात आपुलकीचे घर निर्माण करणार्या याच संघर्ष योध्द्याला आज लोकनेता म्हणून संबोधले जात आहे, या लोकनेत्याचं नेतृत्व, कर्तृत्व आणि दार्तृत्व खूप मोठे होते, त्यामुळेच असा लोकनेता पुन्हा होवूच शकणार नाही, या कणखर लोकनेत्याचा वसा त्यांच्या दोन्ही कणखर लेकी पुढे घेवून जात आहेत. विशेष म्हणजे साहेबांचं जनसेवंचं काम, त्यांचा रूबाब आणि दरारा मुंडे भगिणीनी आजही कायम ठेवला आहे. याचा बीड जिल्ह्यालाच काय तर संपूर्ण महाराष्ट्रालाही अभिमान वाटत आहे.
उरात बाळगलेलं स्वप्न पुर्ण करण्याची जिद्द आणि धमक ज्याकडे असते त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नसते, हेच स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सर्वांना दाखवून दिले, डिसेंबर महिना सुरू झाला की 12 डिसेंबर ही तारीख सर्वांच्या डोळ्यासमोर येते. बीड जिल्ह्यातल्या तमाम जनतेच्या जीवनात या तारखेला कालही महत्व होते, आजही आहे आणि उद्याही कायम राहणार आहे. 12 डिसेंबर ही मुंडे साहेबांच्या वाढदिवसाची तारीख, असं कधी वाटलचं नव्हतं की हा दिवस प्रत्येकाच्या मनातून पुसुन जाईल, दुर्दैवाने तसं घडलं आणि साहेबांचं निधन झालं. ज्या दिवसाला दिवाळी साजरी करायची तो दिवस आज फक्त आठवणीने साजरा करावा लागत आहे, हे दु:ख पचविणे खूपच कठीण आहे, मुंडे साहेब काय होते आणि त्यांनी गोर-गरिबांचे संस्सार कसे उभे केले हे संपूर्ण देशवाशियांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. साहेबांचा प्रत्येक क्षण आठवणीत ठेवण्याजोगा आहे. अधिक काळ सत्ता नसतानाही मुंडे साहेबांनी विरोधकांमध्ये दरारा तर निर्माण केलाच होता, मात्र कधी कधी विरोधी पक्षातील महत्वाचे निर्णयही त्यांच्याच सांगण्यावर व्हायचे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचा वेगळाच दबदबा होता, त्यांचा हाच दबदबा आज त्यांच्या कर्तृत्वान लेकींनी कायम ठेवला आहे, साहेबांचे काम त्यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याच्या अनुषंगाने कर्तृत्वान लेकींनी गोपीनाथ गड उभा केला. याच गडावरून मुंडे भगिणी जनतेला साहेबांच्या जयंती आणि पुण्यस्मरणादिवशी उर्जा देण्याचे काम करीत आहेत. साहेबांना जावून जवळजवळ सात वर्षे लोटली. प्रत्येकाच्या डोळ्यासमोरून हा चेहरा आजही हटता हटत नाही, त्यांच्या आठवणी क्षणाक्षणाला आल्याशिवाय राहत नाहीत, कारण प्रेम करणारा माणूस कधीच डोळ्याआड जात नाही, आजही साहेबांची आठवण आली की त्या लोकांच्या डोळ्यात टपाटपा पाणी येतं, तळागाळातील लोकांच्या अडचणींसाठी धावून गेलेल्या मुंडे साहेबांची ही खरी किमया आहे. साहेबांनंतर त्यांचं जनसेवेचं हे काम पुर्णपणे थांबेल, संपेल असे अनेकांना वाटले होते, मात्र असा विचार करणार्या लोकांना स्वत:च्या तोंडात हात घालण्याची वेळ त्यांच्या कर्तृत्वान लेकींनी आणलेली आहे. साहेबांच्या त्याच चार ओळी मुंडे भगिणींनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत, त्यानुसार त्या दोघी बीडसह संपूर्ण राज्यात धडाडीने काम करत आहेत. जसे साहेबांनी आपल्या उभ्या आयुष्यात आठरापगड जाती-धर्माच्या लोकांना खंबीरपणे साथ दिली, अगदी त्याचप्रमाणे मुंडे भगिणीही त्यांना साथ देत आहेत. जन्म आणि मृत्यूचा खेळ माणसाच्या हातात नव्हे तर तो देवाच्या हातात असतो, ज्याचा जन्म झाला तो कधी ना कधी जणारचं, हे सुत्र ठरलेलेचं असते, मात्र या दोन्ही गोष्टीतील हिशोब प्रत्येकाने करून पाहिला पाहिजे, हा हिशोब साहेबांच्या बाबतीत केला तर जन्माला आलेला हा माणूस केवळ माणूस म्हणून नव्हता तर तो एक अवतारी महापुरूषच होता, असे म्हणावे लागेल, कारण ज्यानं आपल्या उभ्या आयुष्यात संघर्ष करून बहुजनांची सेवा करत समुद्रासारखी नुसती माणसेच जोडली, लोक कल्याणकारी दृष्टी असलेला हा नेता ज्यानं समाजातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी आयुष्य झिजवले, मग तो माणूस कोणत्याही धर्माचा आणि समाजाचा असो, प्रश्न सोडविताना त्यांनी कधीच जात-धर्म पाहिला नाही, बीड जिल्ह्याच्या राजकारणात अनेक घराण्यांचा काळ होवून गेला, गोपीनाथरावांचा काळ मात्र एका आगळ्यावेगळ्या नेतृत्वाचा आणि धगधगत्या पर्वाचा होता, कुणाला पटो अथवा न पटो, पण मुंडे साहेबांचं नेतृत्व खरोखरच आवतारी पुरूषाचे होते, या नेतृत्वामुळेच बीड जिल्हा राज्याच्याच नव्हे तर देशाच्या नकाशावर गेला. त्यांची ही कारकिर्द कोणीच पुसू शकणार नाही, सर्व सामान्य कुटूंबात जन्म घेणार्या या नेतृत्वाने मुंबईबरोबरच दिल्लीही गाजवली, सत्ता असो कि नसो त्यांचा रूबाब आणि दरारा कायमच असायचा, मराठवाड्याचा आधार म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले, त्यामुळे साहेब सत्तेत आल्यानंतर आपले प्रश्न पुर्णपणे सुटतील, असा विश्वास प्रत्येकाच्या मनात होता, याच साहेबांवर विश्वास ठेवून 2014 ला जनतेने साहेबांचं सरकार दिल्लीत बहुमताने बसविले, मात्र नियतीने तोही घास हिरावून घेतला. डोगराएवढं हे दु:ख पंकजाताईंनी आपल्या उराशी घेतलं. आणि साहेबांचं हेच काम पुढे अखंडपणे चालू ठेवलं, जनसेवेच्या या कामात पंकजाताईंनी आपल्या लहान बहिणीला खासदार करून सोबत घेतलं. ‘माझा जिल्हा माझी माणसं’ ही घोषणा मुंडे साहेबांनी केली होती, ही घोषणा आपल्या डोळ्यासमोर ठेवून पुढे मुंडे भगिणींनी बीड जिल्ह्यात विकासाचा महापुर आणला, विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून खेचून आणलेला कोटट्यावधींचा निधी आणि त्यातून जिल्ह्यात पुर्णत्वास जात असलेले मोठं मोठे प्रकल्प हे सर्व सामान्य लोकांची मने जिंकणारीच आहेत, या सर्व गोष्टींंमुळेच लोकांचे आशिर्वाद आणि प्रेम आजही मुंडे भगिणींच्या पाठीशी कायम आहेत. आणि ते भविष्यातही कायमच राहणार आहेत. वास्तविक पाहता साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य संतश्रेष्ट भगवान गडासाठी खर्च केले, भगवानगडाला त्यांच्यामुळे देशाच्या नकाशावर खरी ओळख मिळाली, त्या गडाचा विकास मुंडे साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर झाला, तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पंकजाताईंनी भगवानगडाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही, सत्तेच्या काळात या गडाचा चेहरा मोहरा बदलण्याचा विचार ताईंनी आपल्या मनाशी घट्ट बांधला होता,मात्र जो त्रास साहेबांना चांगल्या कामात व्हायचा, अगदी तसाच त्रास ताईंनाही यावेळी झाला, मात्र अशा वेळी वेगवेगळ्या संकटांना तोंड आणि भगवान बाबांचे विचार प्रत्येकाच्या मनात रूजविण्यासाठी याच कर्तृत्वान लेकीने बाबांच्या जन्मगावी त्यांचं भव्य दिव्य असं स्मारक उभा केलं, या स्मारकामुळेच बाबांचे जन्मगाव (सावरगाव) देशाच्या नकाशावर आलेे, कशाचीही तमा न बाळगता आणि कोणत्याही संकटांपुढे न डगमगता मुंडे भगिणी जनसेवेचा हा गाढा यशस्वीपणे चालवित आहेत, त्यामुळे मुंडे साहेबांना लोकांनी जशी साथ दिली अगदी तशीच साथ यापुढे ते मुंंडे भगिणींना देणार आहेत, हे कोणालाही नाकारता येणार नाही, आज साहेबांच्या जयंतीनिमित्ताने पुन्हा एकदा मागच्या काही दिवसांची आठवण वार्यासारखी डोळ्यासमोर उभी राहते, साहेबांचा तो रूबाबदार चेहरा, पहाडी आवाज, राजबिंड नेतृत्व, तो केसातला कंगवा, अंगावरचं जाकिट आणि पानाचा विडा या गोष्टी जेव्हा डोळ्यासमोर उभा राहतात, तेव्हा आजही प्रत्येकाचं मन खिन्न होतं, जिल्ह्यात असं एकही राजकिय घराणं नाही ज्या घराण्याला साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, सर्वांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत झालेली असल्याने विविध पक्षातले लोक साहेबांच्या आठवणीला उजाळा देतात, त्यामुळे असा लोकनेता पुन्हा होणार नाही, हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या कृर्तृत्वाचा ठसा उमटविणार्या याच लोकनेत्याला जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!
राजकारणात वाहणार्या वार्याचीही
दिशा जादूच्या कांडीने बदलली
राजकारणात वाहणार्या वार्याची दिशा बदलण्याची ताकत मुंडे साहेबांमध्ये होती, या ताकतीच्या जोरावरच त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अनेकवेळा बदल घडवून आणले, यामध्ये सर्व सामान्य कुटूंबातील अनेकांना त्यांनी आमदार, खासदार, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह इतर लोकप्रतिनिधी तयार करण्याची त्यांच्याकडे मोठी फॅक्टरीच होती, असे अनेक दिग्गज नेते आजही आपल्या भाषणात सातत्याने सांगतात.
महाराष्ट्राचा कणखर गृहमंत्री म्हणून ठसा उमटविला
भारतासह संपूर्ण जगाचे मुंबईवर लक्ष आहे, एकेकाळी या शहरावर गुन्हेगारांची मोठी दशहत होती, प्रत्येक दिवसाला शहरात सर्वांना हादरा बसेल अशा भायणक घटना घडायच्या, मात्र ज्यावेळी राज्यात स्व.गोपीनाथ मुंडे यांची सत्ता आली, त्यावेळी मुंडे साहेबांनी आपल्याकडे असलेल्या गृह मंत्रालयाच्या माध्यमातून शहरातील ही संपुर्ण गुन्हेगारी मोडीत काढली. यावेळी पोलिसांशी झुंज देताना अनेकांचा मृत्यू झाला तर अनेक जण देश सोडून गेले, देश सोडून गेलेले गुंड आजही भारतात परत आलेले नाहीत, त्यामुळे गृहमंत्री असावा तर तो मुंडे साहेबांसारखा अशीही चर्चा सातत्याने होते.
शेतकर्यांची आण, बाण आणि शानच
सर्व सामान्य कुटूंबात जन्म झाल्यामुळे मुंडे साहेबांना प्रत्येकाच्या प्रश्नांची खर्या अर्थाने जाण होती, शेतकर्यांच्या काय वेदना असतात हे सदैव डोक्यात आणि डोळ्यासमोर ठेवून मुंडे साहेबांनी शेतकर्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविला. त्यांनी सातत्याने उठवलेल्या आवाजामुळेच शेतकर्यांचे खर्या अर्थाने अनेकदा प्रश्न सुटले, यामुळेच मुंडे साहेबांबद्दल शेतकर्यांच्या मनात आपुलकीचे एक घर तयार झाले होते. त्यामुळेच शेतकर्यांचा कैवारी म्हणूनही मुंडे साहेबांकडे पाहिले गेले.
देशभरात साहेबांच्या कृर्तृत्वाचा डंका
मुंडे साहेबांनी आपल्या कृर्तृत्वातून देशामध्ये आपली एक वेगळी छाप पाडली होती. साहेबांच्या याच कार्याची दखल भारतीय डाक विभागालाही घ्यावी लागली. त्यांच्या पुण्यतिथी दिनी भारतीय डाक विभागाने त्यांची प्रतिमा असलेल्या तिकिटाचे प्रकाशन केले. याआधी राष्ट्रसंत भगवान बाबा, यशवंतराव चव्हाण, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अशा महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींच्या तिकिटाचे प्रकाशन भारतीय डाक कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे. भारतीय डाक विभागाने लोकनेत्याच्या केलेल्या या सन्मानामुळे बीड जिल्हाच काय तर संपूर्ण महाराष्ट्राची मान पुन्हा गर्वाने ताठ झाली आहे.
पंकजाताई साक्षात गोपीनाथराव मुंडेंचं
मुंडे साहेबांचे नाव घेवून विरोधक प्रत्येक वेळी स्वत:ची राजकिय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र विरोधक कितीही दिशाभुल करत असले तरी ते जनतेला कधीच पटणार नाही, कारण पंकजाताईचं मुंडे साहेबांचे विचार मनात घेवून खर्या अर्थाने आज काम करीत आहेत. ताईंनीच ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी साहेबांच्या नावाने महामंडळ अस्तित्वात आणले, साहेबांच्या नावाने शेतकर्यांसाठी योजनाही सुरू केली, विशेष म्हणजे ज्याप्रमाणे बीड जिल्ह्याचा साहेबांना विकास करायचा होता, अगदी त्याचप्रमाणे पंकजाताईंनी तो करून दाखविला असून पंकजाताई साक्षात गोपीनाथराव मुंडेंचं असल्याचे प्रत्येकाला आता जाणवत आहे. त्याच मुंडे साहेबांच्या सक्षम आणि खर्या वारसदारही आहेत. दरम्यान ज्या कामगारांच्या प्रश्नांसाठी साहेबांनी आपल्या जीवाचे राण केले त्याच कामगारांच्या वेदना जाणून घेण्यासाठी पंकजाताई आज ऊसाच्या फडावर जाणार आहेत.
लढवय्या लेकींनी उभा केलेले कार्य
महाराष्ट्राला सलाम करायला लावणारे