Site icon लोकाशा-बंब न्यूज

घोटाळेबाजांच्या गळ्याभोवतीचा फास आणखी घट्ट !आरोग्य भरतीसाठी पैसे देणार्‍यांच्या हातातही आता पडू लागल्या बेड्या, बीडमधील अनेक जण निशाण्यावर, पेपरसाठी आठ लाख दिल्याबद्दल बीडमधून तरूणाला उचलले तर उस्माणाबादमधूनही एक गजाआड


बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : आरोग्य विभागाच्या भरतीसाठी पाच लाख रूपयांपासून 25 लाख रूपयांपर्यंत अनेकांची डिल झाली होती, त्यामुळेच या भरतीचा पेपर फुटला, यामध्ये आरोग्य विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी आडकू लागले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात पुणे सायबर क्रॉईमने चौदा जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील घोटाळेबाजांच्या गळ्याभोवतालचा फास आता आणखी घट्ट होताना पहायला मिळत आहे. कारण हा घोटाळा करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांच्याही पाठीमागे पोलिस चांगलीच हात धुवून लागले आहेत. त्यानुसार शुक्रवारी बीडमधील एका 33 वर्षीय तरूणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याने आरोग्य विभागाच्या पेपरसाठी आठ लाख रूपये दिल्याचे निष्पन्न झाले आहेत. तर उस्माणाबाद येथील एका 23 वर्षीय तरूणालाही पैसे दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपास कसा कसा होतो, आणि या प्रकरणात बीडमधील आणखी कोणा-कोणाला अटक होते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
आरोग्य विभागाच्या भरतीचा पेपर फोडल्याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलीस स्टेशन, गुरनं 53 / 2021 भादवि कलम 406, 420, 409, 120 – ब, 34 सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (1990 सुधारीत ) कलम 3, 5, 6, 8 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात यापुर्वी अटक आरोपी प्रशांत व्यंकटराव बडगिरे, मुख्य प्रशासकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, लातुर यांना आरोग्य विभागाचे गट ड च्या परिक्षेचा फुटलेला पेपरच्या मोबादल्यात त्यांना लाखो रुपये देणारे परिक्षार्थी रडारवर आहेत. यापैकी नामदेव विक्रम करांडे (वय- 33 वर्षे , धंदा शिक्षण , रा . रो हाऊस नं . 3 , अष्टविनायक कॉलनी , कॅनल रोड , गयानगर, बीड) आणि उमेश वसंत मोहीते (वय 24 वर्षे , धंदा- शिक्षण , रा . मु . कोंताळ , पो . बलसूर, ता . उमरगा , जिल्हा उस्मानाबाद) या दोघांना उमरगा व बीड येथून ताब्यात घेतले आहे. त्यातील नामदेव करांडे याने बडगिरे यास 8 लाख रुपये व उमेश मोहिते याने 5 लाख ठरवून 2 लाख रुपये दिल्याचे उघड होत आहे. त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना शुक्रवारी सकाळी 11.50 वा. अटक करण्यात आली आहे. त्यांनी इतर कोणास पेपर दिला आहे, याचाही तपास चालू आहे. सदर आरोपीतांस पोउनि डफळ, पोलीस अंमलदार अनिल पुंडलीक, अश्विन कुमकर, चालक सुनिल सोनोने या पथकाने पकडले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण 14 आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.

पुन्हा बीडमधील घोटाळेबाज नवटक्केंच्या रडारवर

माजलगावमध्ये डीवायएसपी म्हणून भाग्यश्री नवटक्के यांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळे करणार्‍यांना त्यांनी चांगलचा हात दाखविलेला आहे. सध्या त्यांच्याकडे पुणे सायबर क्राईम विभागाची जबाबदारी आहे, आरोग्य विभागातील भरती प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सध्या याच विभागाकडे आहे, त्यामुळे बीडमधील घोटाळेबाज पुन्हा नवटक्केंच्या रडारवर आले आहेत. अटक केलेल्या आरोपींनी फोडलेला पेपर नेमका कोणा-कोणास दिला, याचाही त्या बारकाईने तपास करत आहेत.
Exit mobile version