Site icon लोकाशा-बंब न्यूज

तिढा सुटला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयघोषाने नगर नाका परिसर दणाणला, नगर नाका चौकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तर कॅनॉल रोडला स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचे दिले नाव

बीड(प्रतिनिधी):- गेल्या अनेक दिवसांपासून नगर नाका चौकाला दोन महापुरुषांचे नाव दिल्याने वादाची परिस्थिती निर्माण झाली होती.मात्र यावर तोडगा काढत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस एडवोकेट सर्जेराव तांदळे यांनी पुढाकार घेऊन हा वाद संपुष्टात आणला आहे. येथील नगर नाका चौकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर कॅनाल रोडला स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. यामुळे दोन समाजात निर्माण झालेला वाद आता संपुष्टात आला असून यानिमित्ताने सामाजिक ऐक्य पहावयास मिळाले.

एका चौकाला दोन महापुरुषांचे नाव दिल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता यात काही विघ्नसंतोषी लोकांनी षड्यंत्र रचून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा डाव ही रचला होता. अनेक वेळा या चौका वरून वाद निर्माण होत होता मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात भाजपाचे जिल्हा सरचिटणीस एडवोकेट सर्जेराव तांदळे यांना यश आले आहे. त्यांनी इंदिरानगर परिसरातील युवकांशी सुसंवाद साधत नगर नाका चौकाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव घेतला तर कॅनॉल रोडला स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मार्ग असे नामकरण केले आहे. यामुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांचे षड्यंत्र हाणून पाडले आहे. यानिमित्ताने दोन्ही समाजाने सामाजिक ऐक्य जपत महापुरुषांचे नाव दिले आहे. यावेळी बोलताना एडवोकेट सर्जेराव तांदळे म्हणाले की, स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते. मुंडे साहेबांनी नामांतराच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवून औरंगाबाद विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी मुंडे साहेब यांना जेलमध्ये ही जावे लागले. मी ही मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे बाबासाहेब सर्वांचे प्रेरणास्थान असून बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे आम्ही अनुयायी आहोत असे एडवोकेट सर्जेराव तांदळे यांनी बोलताना सांगितले. आता चौकाचा तिढा सुटला असून सर्वांनी सामाजिक ऐक्य जोपासावे असा संदेश एडवोकेट तांदळे यांनी दिला यावेळी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या उद्घाटन कार्यक्रमात कल्याण चे माजी महापौर अण्णा रोकडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल बोराडे, अभय मगरे, नगरसेवक भैय्यासाहेब मोरे, गौतम मोरे, संतोष राख, सुनील थोरात, सचिन आप्पा सोनवणे, मनोज बोराडे,अमर सानप,केशव तांदळे, मुन्ना गायकवाड, विशाल खाडे, किरण ससाणे,आकाश जावळे, किरण बोराडे, उदयनराजे सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय लव्हाळे, संजय धुरंधरे आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version