धारूर, दि. 9 (लोकाशा न्यूज) : धारुर तालुक्यातील आवरगाव या आदर्श ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी सौ राधा अमोल जगताप यांची पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे धारूर तालुक्यात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
धारुर तालुक्यातील आवरगाव ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होत होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल जगताप यांचे उत्कृष्ट कार्य पाहता गावकर्यांनी सौ राधा अमोल जगताप यांची आवरगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी सर्वानुमते बिनविरोध निवड केली आहे. त्यामुळे आवरगावमध्ये आनंदाचे वातावरण असून सौ राधा जगताप यांनी उर्वरित काळामध्ये गावांमध्ये उत्कृष्ट कार्य करून जनसेवा करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांची बिनविरोध निवड झाल्याने विद्यमान आमदार प्रकाश दादा सोळंके, बीड जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती युवकांचे र्हदयस्थान जयसिंग भैय्या सोळंके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल जगताप, तसेच आवरगावमधील सर्व गावकर्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सौ. राधा जगताप यांची आवरगाव ग्रामपंचायतच्या सदस्यपदी बिनविरोध निवड
