Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड रेल्वे मार्गाच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी खा. प्रीतमताई रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना भेटल्या, तीन एक्सप्रेस रेल्वेना घाटनांदूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचीही केली मागणी


दिल्ली, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष श्री.सुनीत शर्मा यांची खासदार प्रीतमताई मुंडे यांनी काल दिल्लीतील रेल्वे भवन येथे भेट घेतली व बीड जिल्ह्यातील रेल्वे विषयक समस्यां संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.

जिल्ह्यातील रेल्वेमार्गात असलेले पूल आणि त्याखालून जाणाऱ्या रस्त्यांच्या बांधणीत असलेल्या तांत्रिक त्रुटींमुळे स्थानिक नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात मी संबंधितांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. रेल्वे विभागाच्या वरिष्ठ पातळीहुन देखील याविषयी सूचना देण्यात याव्यात, जेणेकरून नागरिकांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि त्यांचे तत्परतेने निराकरण होईल असे श्री.शर्मा यांना सूचित केले.

तसेच नांदेड-बेंगलोर हंपी एक्सप्रेस, हैदराबाद-औरंगाबाद एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस या जलद रेल्वे गाड्यांना परळी तालुक्यातील घाटनांदूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी त्यांनी निवेदन दिले दिले.

Exit mobile version