Site icon लोकाशा-बंब न्यूज

महिलेस जिवंत जाळणार्‍या पतीसह दिरास आजन्म कारावास, जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांचा निकाल



बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : खून प्रकरणातील दोन आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीडचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एस. पाटील यांनी हा महत्वपुर्ण निकाल दिला आहे.
सदर प्रकरणातील वर्ष, रा. पोखरी, ता. जि.बीड ही तिच्या सासरच्या लोकांकडून नवर्‍याच्या हिश्याची वडिलोपार्जित शेती नावे करून मागत असल्याचे कारणावरून यातील फिर्यादीचा पती/आरोपी क्र.1 नामे शाहाजी आश्रुबा फाळके (वय-35, रा.पोखरी, ता.जि.बीड), तसेच फिर्यादीचा भाया/आरोपी क्र.2 नामे बबन आश्रुबा फाळके, वय-42, रा.पोखरी, ता.जि.बीड व फिर्यादीची सासू/आरोपी क्र.3 नामे सोजरबाई भ्र.आश्रुबा फाळके यांनी मयतास वारंवार त्रास देऊन, भांडण करून तिस धमक्या दिल्या. तसेच दि.13 मे 2016 रोजी पाहाटे 04.00 ते 07.00 वा. दरम्यान पोखरी, ता.जि.बीड येथे फिर्यादीच्या राहते घरी आरोपी क्र. 1 व 2 यांनी फिर्यादीचे अंगावर रॉकेल टाकून अंगाला काडी लावून तिस आग लावली. यात फिर्यादी 96 टक्के भाजली व दि. 19 मे 2016 रोजी रात्री 02.10 वा. उपचारादरम्यान फिर्यादी मरण पावली. उपचारादरम्यान फिर्यादीने दिलेल्या मृत्यपुर्व जबाबावरून पोलीस ठाणे नेकनूर अंतर्गत गु.र.नं.68/2016 कलम 302,307,498अ,506,34 भादंवि अन्वये गुन्हा नोंद हाऊन गुन्ह्यांचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्री आर. बी. पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला. ’तपासीक अधिकारी यांनी तपासामध्ये दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर वर नमुद तीन आरोपीविरूध्द अंतीम दोषारोपपत्र मा. न्यायालयास सादर केले. सदर प्रकरणाचा सुनावणी मा.जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश 4 थे, बीड यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीअंती आरोपी क्र.1 नामे शाहाजी आश्रुबा फाळके, वय-35, रा.पोखरी, ता.जि.बीड, तसेच क्र.2 नामे बबन आश्रुबा फाळके, वय-42, रा.पोखरी, ता.जि.बीड यांच्याविरुध्द कलम 302,34 भादंवि अन्वये गुन्हा सिध्द झाल्याने त्यांना आजन्म साध्या कारावासाची शिक्षा व प्रत्येकी 5000/- रु. दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरीक्त सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील बी. एस. राख यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज पोह/1170 एम. बी. मिसाळ यांनी पाहिले आहे.

Exit mobile version