Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्ह्याने आज एक सच्चा सैनिक गमावला !देशासाठी बलिदान देणारे वीर जवान अविनाश आंधळेंना मुंडे भगिणींनी अर्पण केली श्रध्दांजली


बीड : तालुक्यातील हिंगणी (खु) येथील सुपुत्र आणि सैन्य दलात कार्यरत असलेले अविनाश आंधळे हे देशासाठी शहीद झाल्याची बातमी कळाली, ते गेली सहा वर्षांपासून सैन्य दलामध्ये राहून देशाची सेवा करत होते, त्यांच्या निधनाने पुर्ण जिल्हा आज शोकाकूल आहे. बीड जिल्ह्याने आज एक सच्चा सैनिक गमावला आहे. ‘असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा’ गंध संपला तरी सुंगध दरवळत राहावा’ याप्रमाणे त्यांनी केलेल्या सेवेच्या रूपात ते सदैव स्मरणात राहतील. स्व. अविनाश आंधळे यांच्या कुटूंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या दु:खातून सावरण्याची ईश्‍वर त्यांना शक्ती देवो आणि स्व.अविनाश आंधळे यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्‍वर चरणी प्रार्थना, अशा शब्दात मुंडे भगिणींनी श्रध्दांजली अर्पण केली आहे.

Exit mobile version