Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडच्या नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार-आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी मंत्र्यांना धक्का, वैजीनाथ तांदळेंसह पाच गावचे सरपंच,चेअरमनसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बीडच्या नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार-आ.संदिप भैय्या क्षीरसागर
माजी मंत्र्यांना धक्का, वैजीनाथ तांदळेंसह पाच गावचे सरपंच,चेअरमनसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
बीड (प्रतिनिधी):- आम्ही लोकांसमोर प्रामाणिक भूमिका घेवून जातोत म्हणूनच लोक विश्‍वास ठेवतात. यापुढे कुठल्याही निवडणूका असो झेंडा तर राष्ट्रवादी काँग्रेसचाच लागेल. यापुढे मॅनेजमेंटचे राजकारण चालणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका राहिल. बीड नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार असून निवडणूकीत दिलेल्या शब्दांची पुर्तता विकास कामांच्या माध्यमातून सुरू आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली. शिवसेनेचे जिल्हा सचिव वैजीनाथ नाना तांदळे यांच्यासह पाच गावचे सरपंच, चेअरमन, शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते बोलत होते. वैजीनाथ तांदळे यांच्या प्रवेशाने राजुरी सर्कल वन साईड झाले असून या प्रवेशाने माजी मंत्री आणि नगराध्यक्षांना चांगलाच धक्का बसला आहे.
सोमवार दि.6 डिसेंबर रोजी बीड शहरातील राष्ट्रवादी भवन येथे शिवसेनेचे जिल्हा सचिव वैजीनाथ तांदळे यांच्यासह अनेक गावचे सरपंच सेवा सोसयटीचे चेअरमन व शेकडो कार्यकर्त्यांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर आसाराम भाऊ गायकवाड, बबनराव गवते, महादेव उबाळे, कल्याण आखाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.यावेळी वंजारवाडी, लिंबारुई, रुईलिंबा तिपटवाडी ,तांदळवाडी पिंपरगव्हाण ,सोनगाव ,काठवाडी साक्षाळपिंपरी, केतुरा आदी गावातील कार्यकर्ते यानी प्रवेश केला.
यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर म्हणाले की, नाना मनाने चांगले आणि पक्के आहेत. या परिवाराचं प्रेम आणि विरोध दोन्ही पाहिलेला आहे. वंजारवाडी राजुरीपासून वेगळी नाही. यापुढे नानांसह प्रवेश करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान आणि संधी दिली जाईल. प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आणि आशिर्वादामुळे मी आमदार होवू शकलो. येणार्‍या निवडणूकीमध्ये कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल आणि जनतेच्या आशिर्वादाच्या बळावर राष्ट्रवादीच काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्‍वासही आ.संदिप क्षीरसागर यांनी व्यक्त करत निवडणुकीत जे-जे शब्द दिले होते ते पूर्ण करू. पुर्वी जे मॅनेजमेंटचे राजकारण चालयचं ते आता चालणार नाही. राजुरी आता वन साईड झाली आहे, बाकीच्या सर्कलमध्येही दिग्गजांचे प्रवेश होतील. येणार्‍या काळात शहरी आणि ग्रामीण भागात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी बोलतांना माजी आ.सय्यद सलीम म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आ.संदिप भैय्या सरळ आहेत. सर्वांना सोबत घेवून शहरी आणि ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्या माध्यमातून बीड शहरातील विविध विकास कामे मार्गी लागत आहेत. प्रवेश करणार्‍या प्रत्येकाला संधी मिळेल आणि सन्मान होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर माजी आ.सुनिल धांडे म्हणाले की, आ.संदिप भैय्या दिलदार मनाचे असून पवार साहेबांचे लाडगे आमदार आहेत. इमानदार कार्यकर्त्याला ते संधी देतील असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ रहा असे आवाहनही त्यांनी केले. तर ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि ताकद घराघरापर्यंत पोहचवा आणि येणार्‍या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवा असे आवाहनही त्यांनी केले तर माजी आ.उषाताई दराडे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी आणि सन्मान देत असतांना सर्व सामान्यांची कामे देखिल मोठ्या प्रमाणात होत आहेत. यापुढे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असे म्हटले आहे. यावेळी तांदळवाडी ग्राम पंचायतचे सरपंच बाळसाहेब फड, उपसरपंच जीवन मनोहर सांगुळे, माजी सरपंच श्रीराम सांगुळे, ग्रा.पं.सदस्य अजय सानप, सुधाकर कांबळे, चेअरमन बाबासाहेब सांगुळे, ग्रा.पं.सदस्य त्र्यंबक सानप, रावसाहेब केदार, किरण सानप, विष्णु केदार, अशोक सांगुळे, बाबु नागरगोजे, केतुरा येथील विजय गिरी मित्र मंडळ, लिंबारूई येथील बबलू दराडे नितीन बिनवडे व ग्राम पंचायत सदस्य तथा उपसर्कल प्रमुख शिवसेना अशोक दराडे, शिवाजी दराडे, गणेश मोटे, से.सो. चेअरमन उत्तम दराडे, से.सो.संचालक नंदकुमार दराडे, मनोहर ठेंगल, हनुमना दराडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख नसीर शेख बशीर, उपाध्यक्ष सुनिल बाबासाहेब दराडे, सखाराम ठाणगे, नामदेव दराडे, रविंद वाघमारे, शेख शब्बीर भाई, पिंपरगव्हाण ग्रा.पं. उपसरपंच मारोती मतकर, ग्रा.पं.सदस्य परमेश्‍वर आगाम, शहादेव आगाम, ग्राम पंचायत अव्वलपुर/सोनगाव सदस्य बळीराम घिगे, महादेव भांगे, लिंबाजी घिगे, दत्ता घिगे, बंकट घिगे, बबन घिगे, बबन घिगे, रोहिदास घिगे, सोमा चव्हाण, केशव घिगे, सुुनिल चव्हाण, काठवटवाडी ग्रा.पं.सदस्य भाऊसाहेब जानवळे, कृष्णा जानवळे, युवा नेते श्रीधर जानवळे, साक्षाळपिंप्रीचे गजानन क्षीरसागर, तारेख शेख, गावर्धन काशीद, फिरोज सय्यद, राजा काशीद, बजरंग गाडे, शिवराज काशीद, युवराज काशीद, श्रीहरी काशीद, उमेश काशीद, राजाभाऊ काशीद, मच्छिंद्र काशीद, भागवत काशीद, रूद्रापुर ग्रा.पं.चे सरपंच शरद आघाव, ग्रा.पं.सदस्य रामनाथ आघाव, सुनिल नागरगोजे, सुग्रीव नागरगोजे, कृष्णा सानप, राजु तळेकर, गणेश भुसारी, अजय नागरगोजे, तिप्पटवाडी ग्रा.पं.चे सरपंच विेष्णु शेंडगे, ग्रा.पं.सदस्य ज्ञानदेव घिगे, शिवाजी एकाळ, दादा पवळ, वंजारवाडी ग्रा.पं.सरपंच अरूण धुरंधरे, उपसरपंच विकास तांदळे, सदस्य महादेव कुटे, अंगद तांदळे, बाबासाहेब तांदळे, लक्ष्मण पवार, से.सो. चेअरमन सुदाम पवार, पांडुरंग राख, शहादेव तांदळे, ज्ञानोबा ढाकणे, अशोक धुरंधरे, बाबासाहेब चव्हाण, प्रभाकर चव्हाण, चंद्रनाथ कुटे, नामदेव कुटे, विश्‍वनाथ तांदळे, सुभाष गांगुर्णे, ग्रा.पं. रूईलिबंाचे शिवसेना उप तालुका प्रमुख बीड मनेश भोसकर, से.सो.चेअरमन सदाशिव साळुंके, माजी सरपंच दिलीप भोसकर, माजी सरपंच शहादेव गिरी, गणेश भोसकर, मिठ्ठु शेख, आत्माराम ओव्हाळ, अजिम सय्यद, रामदास पुरी, शहाजहानपुरचे कैलास सोनवणे, लखन गिरी व रावसाहेब भोसकर, शिवाजी भोसकर, विलास पवार, क्षमु पिसाळ, रामदास पुरी, यशवंत कडबाने, संदिपान भोसकर, रहिमान शेख, अकबर शेख, आत्माराम ओव्हाळ, तय्युब शेख, गुलाब गिरी, भानुदास पुरी, पांडुरंग कडबाने, गणपत राहींज, अजीम सय्यद, विशाल ओव्हाळ, सतिश नन्नवरे, संभाजी साळुंके, दत्ता भोसकर, अमोल ओव्हाळ, अविनाश कुटे, रोहन कांबळे, राधाकिसन जाधव, बाबु जाधव, विकास भोसकर, योगेश साळुंके, आकाश पवार, मईबुद्दीन शेख, शिवाजी खरात, विष्णु घाडगे यांनी प्रवेश केला.

चौकट
ये तो टेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं-वैजीनाथ नाना तांदळे
कार्यकर्त्यांचे उपकार मी विसरू शकणार नाही, प्रवेश करतांना आनंद होत आहे. माझ्या गावात दर दिवसाला पाणी देतो परंतू पाणी उपलब्ध असतांना बीड शहराला पंधरा दिवसाला पाणी मिळत आहे. बीड शहरात घाणीचे साम्राज्य असून ही राजकारणतली घाण साफ करायची आहे. स्व.काकूंना वंजारवाडीतून बिनविरोध ग्रा.पं.सदस्य ज्येष्ठ मंडळींनी दिल्यानंतर काकू राजुरीच्या सरपंच झाल्या. तेंव्हापासून क्षीरसागर कुटुंबाशी प्रेमाचे संबंध आहेत. मध्यंतरी काही गैरसमजातून दुरावा झाला, ज्यांच्याकडे गेलो त्यांनी मात्र विश्‍वासघात केला असे म्हणत त्यांनी माजी मंत्री व नगराध्यक्ष पिता-पुत्रावरही कडाडून टिका केली. येणार्‍या काळात माझ्या बरोबर प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्याला सन्मान व संधी मिळेल असा विश्‍वास व्यक्त करत त्यांनी उपस्थितांना आ.संदिप भैय्यांच्या पाठिशी ताकद उभी करा असे आवाहन केले. ये तो टेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं असे म्हणत येणार्‍या काळात राष्ट्रवादीचेच दिवस असतील असेही त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version