सिरसाळा न्यूज : वांगी तलावात दोन दिवसां पुर्वी सापडलेले पुरुष जातीच्या प्रेताची जवळपास ओळख पटल्याचे समजते आहे .
गेल्या चार पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या संतोष बळीराम देवकते वय ३२ रा.कुरनूरवाडी ता.अंबाजोगाई याचा शोध नातेवाईक घेत होते. बेपत्ता असल्याची तक्रार देखील अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशन येथे दाखल केल्याचे समजते आहे. सिरसाळा पोलिस स्टेशन हद्दीत वांगी तलावात अनोळखी प्रेत सापडल्या नंतर याची खबर प्रत्येक पोलिस स्टेशन व दैनिकात होती. या वरुन संबधिताचे नातेवाईकांनी सिरसाळा पोलिस स्टेशन येथे धाव घेतली आहे. सदरचे प्रेत संतोष बळीराम देवकते चे असल्याचे त्यांनी प्रथमदर्शनी छायाचित्र पाहून म्हटंले आहे. वर्णना नुसार प्रेत संतोषचेच असल्याची खात्री नातेवाईकांना आहे.
मेंढी पालन करणारा संतोष दिनांक २८ नोव्हेंबर पासुन बेपत्ता होता, मेंढ्या खरेदी विक्री संदर्भात काही व्यापा-यांशी त्याचा व्यावहार असल्याचे नातेवाईकाकडून समजले आहे.पैशाच्या देवान घेवानी वरुन संतोष चा संबंधित व्यापा-यांनीच खून केला असल्याचा त्यांनी संशय व्यक्त केला आहे.ह्या घटनेने सिरसाळा सह परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक तपास सह पोलिस निरिक्षक प्रदिप एकशिंगे व पोलिस उपनिरीक्षक शेळके सह त्यांची टिम करत आहे. जवळपास ओळख पटली असल्याने घटनेचे गौडबंगाल बाहेर नक्कीच पडणार आहे. नातेवाईकांनी दावा केलेले प्रेत संतोषचेच आहे का ? आहे तर खुन का झाला याचा पुर्ण उलगडा लवकरच होणार यात काही शंका नाही.