Site icon लोकाशा-बंब न्यूज

वीज महावितरण ते तहसील कार्यालय लोटांगण आंदोलन

कडा :- वीज महावितरण शेतक-यांसोबत मनमानी कारभाराला कंटाळून अनेकदा तहसीलदारांच्या दारात लाक्षणिक उपोषण केले, आष्टी, धानो-यात चक्काजाम आंदोलन करुनही शेतक-यांना न्याय देण्याऐवजी महावितरण हुकमी राजवट गाजवत आहे. तर शेतकरी आंदोलनात दिलेला शब्दही अधिकारी पाळत नाही. शेतकरी बांधवांचा विद्युत पुरवठा खंडित केला जातोय. शेतक-यांकडून आठ हजार रूपये प्रति कनेक्शन भरना करून घेत आहे. त्यामुळे वीज महावितरणच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके यांनी अक्षरश: शेतक-यांसह लोटांगण घेत आष्टीत गांधीगिरी आंदोलन केले. वीज महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांचे कार्यलयात ते तहसील कार्यालयापर्यंत अक्षरश: लोटांगण घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
याप्रसंगी सरपंच राम बोडखे, शिवसंग्रामचे ज्ञानेश्वर चौधरी, सचिन आमले, कासम शेख ,माऊली थोरवे, बाबु धनवडे, छगन साबळे, धनंजय फिस्के, तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतक-यांनी वीज महावितरण कार्यालयाला चक्क हार अगरबत्ती हळद-कुंकु लावू‌न श्रीफळ वाढवून पूजा केली. तसेच तहसिल कार्यालयापर्यंत टाळ मृदुंग हरिनामाच्या गजरात सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके यांनी लोटांगण घेऊन गांधीगिरी आंदोलन करुन आष्टीकरांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले.

Exit mobile version