बीड ।दिनांक २८।
राजकारणात सर्व सामान्य माणसांत मिसळणाऱ्या नेत्यालाच ‘लोकनेता’ उपाधी मिळते, अगदी त्याचाच प्रत्यय भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याबाबतीत पुन्हा एकदा अनुभवास आला.
झाले असे की, पंकजाताई मुंडे आज सायंकाळी औरंगाबादहून परळीकडे जात होत्या, बीडमध्ये पंकजाताई बशीरगंज भागात आल्याचे समजताच या भागातील शेख जमील यांनी त्यांना त्यांच्या जमील पान सेंटरला भेट देण्याचा आग्रह केला, पंकजाताईंनी त्यांना लगेच होकार दिला आणि तीथे पोहोचल्या आणि लोकांमध्ये मिसळल्याही..! पान सेंटरमध्ये गेल्यावर स्वतः पान तयार करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही, त्यांनी स्वतः पानाचा आस्वाद तर घेतलाच पण सोबतच्या सर्व सहकाऱ्यांनाही पान बनवून दिले. या प्रसंगाने उपस्थित गर्दीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचीच आठवण आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, सर्जेराव तांदळे आदी यावेळी सोबत होते.