Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्हाभरात राबणार व्हॅक्सिनेशन रविवार -जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा

माजलगाव :- सुमारे दहा दिवसापूर्वी माजलगाव तालुक्यातील परभणी टी पॉइंट येथे लसीकरण वाढावे यासाठी नवीन कल्पना राबवित व्हॅक्सिनेशन चेक पोस्ट ही संकल्पना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी जिल्हाधिकारी श्री राधाबीनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार आणली या संकल्पने ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून जिल्हाभरात योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले त्यानंतर मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊ लागले सर्वात प्रथम माजलगाव येथे सुरू झालेल्या या संकल्पनेत तील कॅम्पला स्वतः जिल्हाधिकारी श्री राधाबीनोद शर्मा यांनी रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान भेट दिली असता त्यांनी जिल्हाभरात व्हॅक्सिनेशन रविवार मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली तसेच आज घडीला अकरा तालुक्यांमधून सुमारे दोनशे तीस ते दोनशे चाळीस ठिकाणी चालू असल्याचे देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यभरात कोरोना नियंत्रणात येत असला तरी संकट अजून संपलेली नाही संपूर्ण लसीकरणासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत होते परंतु त्यात म्हणावे असे यश मिळताना दिसून येत नव्हते नागरिक देखील लसीकरणा कडे पाठ फिरू लागले होते परंतु यातून अधिकचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती कुरणावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण चेकपोस्ट ही संकल्पना आणली याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला ही संकल्पना आता राज्यभरात राबविली जात असून अनेक ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्राची आवश्यकता भासत आहे तदनुषंगाने संपूर्ण बीड जिल्ह्यात लसीकरण रविवार मोहीम राबविण्यात येत असून माजलगाव येथील लसीकरण कॅम्प ला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी नीलम बाफना , मुख्याधिकारी विशाल भोसले , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बडे , डॉ. गजानन रुद्रवार , डॉ. प्रवीण वारकरी, डॉ. दत्तात्रय पारगाव आदींसह लसीकरण पथकातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शर्मा यांनी यावेळी लसीकरण पथकातील कर्मचाऱ्यांना स्वतः सूचना करीत ते लसीकरनासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा देखील त्यांनी केली तसेच कांही अडचणी असल्यास आपल्या अधिकाऱ्यांमार्फत कळविण्यास देखील त्यांनी सांगितले. दरम्यान परभणी फाट्यावर सुरू असलेल्या लसीकरण कॅम्प ला महसूल प्रशासनासह नगर परिषद प्रशासनाची देखील चांगली साथ मिळत असून पालिकेचे गणेश डोंगरे, विलेश कांबळे,संकेत साळवे,अनंत वाघमारे,शंकर चव्हाण, संतोष घाडगे,संजय ससाणे, आरेफभाई पटेल आदी प्रयत्नरत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांची माजलगाव धरणाला भेट
लसीकरण कॅम्पला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी हे येथील माजलगाव धरणावर गेले. त्या ठिकाणी धरणाची पाहणी करून धरणातील पाणीसाठा व इतर बाबींचा आढावा घेतला तसेच येथील अधिकाऱ्यांना पाण्याच्या नियोजनाबाबत सूचना देखील केल्या.

Exit mobile version