Site icon लोकाशा-बंब न्यूज

अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचा प्रश्‍न सुटला,144 शिक्षकांचे झाले समायोजन, सोमवारी शिक्षकांना मिळणार ऑर्डर


बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचा प्रश्‍न जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, शिक्षण सभापती बजरंग सोनवणे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी मार्गी लावला आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील 144 सहशिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे, त्यानुसार सोमवारी या 144 शिक्षकांना ऑर्डर मिळणार आहे.
मागच्या दहा वर्षांपुर्वी नियम धाब्यावर बसून जिल्हा परिषदेचा कारभार हकण्यात आला. यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले, जिल्ह्यात अतिरिक्त झालेल्या अनेक शिक्षकांना राज्याच्या तत्कालिन ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या तात्कालिन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी खर्‍या अर्थाने न्याय मिळवून दिला. कारण त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे अतिरिक्त शिक्षकांचे तात्काळ समायोजन झाले, केवळ 159 अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्‍न सुटलेला लागलेला नव्हता. ते सध्या प्राथमिक पदविधरच्या जाग्यावर आपले कर्तव्य बजावत होते, त्यानुसार त्यांचे समायोजन करण्यासाठी झेडपीच्या विद्यमान अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, शिक्षण सभापती बजरंग सोनवणे आणि सीईओ अजित पवार यांनी पुढाकार घेतला, याअनुषंगानेच सदर शिक्षकांना शुक्रवारी येथील सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात बोलावण्यात आले होते, 159 पैकी 144 शिक्षकांचे समायोजन करून घेण्यात आले आहे. समायोजन झालेल्या शिक्षकांना सोमवारी ऑर्डर मिळणार असून उर्वरित 13 शिक्षकांचेही लवकरच समायोजन होणार आहे. या समायोजनादरम्यान शिक्षणसभापती बजरंग सोनवणे, सीईओ अजित पवार, डेप्टी सीईओ प्रमोद काळे, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

आधी मुख्याध्यापकांना तर आता शिक्षकांना
न्याय मिळाला
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 98 मुख्याध्यपकांच्या जागा रिक्त होत्या, या जागा सीईओ अजित पवार यांनी आधी भरून घेतल्या, त्यामुळे अतिरिक्त असलेल्या शिक्षकांना शुक्रवारी सीईओ अजित पवारांना खर्‍या अर्थाने न्याय देता आला आहे, यामुळेच संबंधित शिक्षकांमधून त्यांच्या कामाचे कौतूक केले जात आहे.

Exit mobile version