Site icon लोकाशा-बंब न्यूज

कुमावतांनी शिवसेनेला बदनाम करण्यासाठी कोणाची सुपारी घेतली? मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक, फक्त बदनामीच्या हेतूनेच माझे नाव गुटखा प्रकरणात गोवले, सेनेला सोडून मी कधीच काम करणार नाही, आरोप सिध्द झाला तर राजकारणातून सन्यास घेईल, पत्रकार परिषदेमधून कुंडलिक खांडेंचा हल्लोबोल



बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : मी सामान्य कुटूंबातून आलोय, घरात कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना आपण आठ निवडणुका लढलो व सात जिंकलो. पक्षासाठी आपण करत असलेले काम प्रस्थापितांच्या डोळ्यात खुपत होते. त्यामळे मला कुठल्यातरी प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरु होता, शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच आपले नाव गुटखा प्रकरणात गोवल्याचा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केला आहे. पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षकांसह इतर पोलिस अधिकार्‍यांचे काम उत्तम असून सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मात्र पक्षाला बदनाम करण्यासाठी कोणाची सुपारी घेतली? असा सावलही खांडे यांनी केला. तसेच गुटखा प्रकरणाशी माझा कसलाही सबंध नाही. या प्रकरणात मी दोषी आढळलो तर राजकारणातून सन्यास घेईल. परंतू माझ्यावर गुन्हा दाखल करणार्‍या अधिकार्‍यानेही मी निर्दोष सिध्द झाल्यास आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे माझे आव्हान असल्याचे खांडे यांनी म्हटले आहे.
गुरुवारी (ता. 25) पत्रकार परिषदेत त्यांचा अंगुलीनिर्देश पुर्णपणे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांकडे दिसत होता. 16 नाव्हेंबरला केजचे सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी नांदूरघाट (ता. केज) येथे दोन ठिकाणी छापे टाकून गुटखा पकडला. त्यानंतर बीड जवळील गोदामांवरही छापे टाकले. यावरुन केज पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद होऊन एका गुन्ह्यात तत्कालिन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव आरोपींच्या यादीत आले. त्यानंतर पक्षाने त्यांच्या जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती दिली तर बुधवारी (ता. 24) खांडे यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायलायाने कायमस्वरुपी अटकपूर्व जामिन मंजूर केला. त्यानंतर त्यांनी बीड, गेवराई व आष्टी – पाटोदा – शिरुर कासार मतदार संघातील शिवसेना पदाधिकार्‍यांना सोबत घेत पत्रकार परिषदेमधून आपली भूमिका मांडली. पोलिस कारवाईवेळी महिलांना दमदाटी करत असल्याने आपण हस्तक्षेप केला. त्यातून गुन्ह्यात नाव नोंदले गेले. आपल्या विरुद्ध सुरुवातीपासून षडयंत्र रचले जात आहे, पक्षाकडे वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने पक्षाची बदनामी करण्यासाठीच आपल्यावर गुटखा प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला. आपल्याला सर्व पदाधिकार्‍यांचा पाठींबा असून सर्वांच्या स्वाक्षरीचे पत्र मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्याचेही कुंडलिक खांडे म्हणाले. आपण कडवट शिवसैनिक असून यापुढेही शिवसेना सोडून काम करणार नाही, पक्ष घेईल तो निर्णय आपण मान्य करणार असल्याचेही कुंडलिक खांडे यांनी सांगितले. मला कसलाही राजकीय वारसा नाही, सामान्य शेतकरी कुटुंबातून मी शिवसेने सारख्या 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करणार्या पक्षाचा जिल्हाप्रमुख बनलो. पद मिळाल्यानंतर माझ्या काम करण्याच्या पध्दतीतून आणि दिवसातील 16 तास काम करून शिवसेचा जिल्हांप्रमुख पक्ष संघटनेसाठी काय करू शकतो हे दाखवून दिले. झपाटून गेल्याप्रमाणे काम करण्याच्या माझ्या या पध्दतीमुळे काही जणांना ते रुचले नव्हते. याच लोकांचे काही तरी षडयंत्र रचून मला बदनाम करण्याचे प्रत्यन सुरू होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे हे लोक माझ्या विरोधात तक्रारी करत, विरोधात निवेदनही देत होते. मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांना माझ्यावर आणि माझ्या काम करण्याच्या पध्दतीवर विश्‍वास असल्याने त्यांची डाळ शिजत नव्हती. यात गुटखा प्रकरण घडले. या प्रकरणाशी माझा काहीही सबंध नसताना मला गोवण्यात आले. केवळ महिलेवर अन्याय होत आहे, म्हणून मी तिथे गेलो. या व्यतिरिक्त या प्रकरणाशी माझा कसलाही सबंध नाही. गुटख्याचे गोडावून माझे नाही, पडलेली गाडी माझी नाही. असे असतानाही थेट माझ्यावर दाखल केलेला गुन्हा षडयंत्राचा भाग होता. न्यायालयाने यात जामीन मंजूर केला. आगामी काळात दुधाचे दुध आणि पाण्याचे पाणी होणार आहे. षडयंत्रकारी लोक एखाद्या नेतृत्वाला परेशान करू शकतात परंंतू पराजित कदापीही करू शकत नाही. माध्यमांमधून चुकीची चर्चा सुरु आहे. शिवसेनेतील सर्व पदाधिकार्यांचा मला पाठींबा आहे. माझ्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. जर माझे पद अबाधित राहिले सर्वांना सोबत घेवून आणि अथवा मला पदावरुन दुर केल्यासही ज्या इच्छुकाची निवड होईल त्यांच्या सोबत मी एक शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. कारण मी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेबांचा कडवट सैनिक आहे. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब आणि ना.आदित्यजी ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असे खांडे यांनी म्हटले. या पत्रकार परिषदेस शिवसेना सचिव वैजिनाथ नाना तांदळे,शिवसेना जिल्हा समन्वयक जयसिंग मामा तांदळे, शिव वाहतूक सेना जिल्हाप्रमुख मशृभाई पठाण, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख हुसेनभाई शेख, जिल्हासंघटक रतन गुजर,उपजिल्हाप्रमुख आशिष मस्के,उपजिल्हाप्रमुख बंडू भाऊ पिंगळे,उपजिल्हाप्रमुख एजाज भाई शेख, उपजिल्हासंघटक भारत भाऊ जाधव,सरपंच गणेश दादा खांडे, ज्येष्ठ नगरसेवक भिमराव वाघचौरे, मा.नगरसेवक रामसिंग अण्णा टाक,तालुका प्रमुख बीड गोरख अण्णा सिंघण,तालुकाप्रमुख पाटोदा राहुल चौरे,तालुकाप्रमुख शिरूर किरण चव्हाण, तालुकाप्रमुख आष्टी कुमार शेळके, तालुका समन्वयक आर्जून दादा नलावडे,तालुका समन्वयक रमेश तंबारे, युवानेते गणेश उगले, उपतालुकाप्रमुख संजय उगले,उपतालुकाप्रमुख संतोष घुमरे,उपतालुकाप्रमुख संदीप सोनवणे,उप तालुका प्रमुख शिवाजी कोलगुडे, युवानेते निलेश जाधव,शहर प्रमुख परमेश्वर बेदरे,उपशहर प्रमुख कल्याण कवचट,तालुका समन्वयक जालिंदर वांढरे, गोरख कदम,उपविभागप्रमुख रणजित कदम, नानासाहेब घल्लाल,युवानेते रमेश शिंदे,युवानेते प्रदीप शिंदे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

सत्य परेशान हो सकता है, पराजीत नहीं

माझ्या सारखा सामान्य कुटुंबातील युवक शिवसेनेचा जिल्हाप्रमुख झाला हे काही प्रस्थापितांच्या जिव्हारी लागले होते. दरम्यान जिल्हाप्रमुख बनल्यानंतर जिथे कमी तिथे मी’ या धोरणाने काम सुरू केले. माझा काम करण्या धडका पाहून आणि पक्ष संघटन पाहून अनेकजण अस्वस्थ झाले होते. मला कुठेतरी गोवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. या परिस्थितीत मला गुटखा प्रकरणात गोवण्यात आले. गुटखा प्रकरणी माझा संबंध नसताना केवळ महिलेला पकडून नेले म्हणून मी तिथे गेलो आणि माझ्यावर आकसबुध्दीने गुन्हा नोंद करण्यात आला. अखेर काल न्यायालयाने या प्रकरण मला जामिनही दिला. सत्याला परेशान करता येते परंतू पराजित नाही हे यातून स्पष्ट झाले आहे, असे कुंडलीक खांडे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
Exit mobile version