Site icon लोकाशा-बंब न्यूज

आजपासून नगरपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू, 21 डिसेंबरला होणार मतदान तर 22 डिसेंबरला लागणार निकाल


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : राज्यात होऊ घातलेल्या 105 नगरपंचायतींमध्ये बीड जिल्ह्यात 5 नगरपंचायींचा समावेश आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता जाहीर करण्यात आल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी केली आहे.

जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, वडवणीसह केज नगरपंचायतींच्या प्रभागरचनेसह आरक्षण सोडतीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. बुधवारपासून (दि.24 नोव्हेंबरपासून) निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. आचारसंहिता सार्वत्रिक निवडणूक असलेल्या संपूर्ण संबंधित नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकार्‍यांना इतरत्रसुध्दा करता येणार नाही, आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
Exit mobile version