नवी दिल्ली, दि. २४ (लोकाशा न्यूज) : कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला मार्च 2022 पर्यंत वाढवण्यास मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत रेशन मिळत राहील. मार्च 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश कोरोना महामारीमुळे निर्माण होणारा ताण कमी करणे हा आहे. सुरुवातीला, ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, मात्र नंतर ती वाढवण्यात आली. त्यानंतर तिची मुदत माहे नोव्हेंबर पर्यंत होती. त्यावर आता यात वाढ करण्यात आली असुन ती आता मार्च 2022 पर्यंत असणार आहे. प्रधान गरीब कल्याण अन्न योजनेत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत 80 कोटी शिधापत्रिकाधारकांना सरकार मोफत रेशन पुरवते. मोफत शिधापत्रिकाधारक शिधावाटप दुकानांमधून मिळणाऱ्या अनुदानित धान्यापेक्षा जास्त आहेत.
मुदत वाढवली; आता मार्च 2022 पर्यंत मिळणार मोफत रेशन
