Site icon लोकाशा-बंब न्यूज

खासदार प्रीतमताईंनी एसटीचा केला पंचनामा!!सर्वसामान्यांना दिवसरात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून राज्य सरकारने त्यांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात : खा. मुंडे

बीड :
राज्यातील परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मागील एका महिन्यापासून संप पुकारला आहे,अत्यंत प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत सर्वसामान्यांना दिवसरात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत.

तसेच संपकरी कर्मचाऱ्यांवर केलेली कार्यवाही मागे घेऊन त्यांना सन्मानपूर्वक कामावर रुजू करून घ्यावे.एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या लढ्यात आम्ही त्यांच्यासोबत आहोत,कारण समाजातील वंचितांवर अन्याय होत असेल तर त्याविरोधात रस्त्यावर उतरण्याचे संस्कार आणि शिकवण आम्हाला मिळाली आहे, असे खासदार प्रीतमताई मुंडे यांनी म्हटले आहे, त्यांनी बीड मध्ये आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आधार दिला विशेष म्हणजे यावेळी आगारातील बसची पाहणी करून एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

Exit mobile version