Site icon लोकाशा-बंब न्यूज

विरोधकांना चित करण्यासाठी खा. प्रीतमताई मैदानात, आगामी निवडणुका एकीने अन नेकीने लढून विजयश्री खेचून आणा, बैठकीत ताईंनी कार्यकर्त्यांना दिले कानमंत्र


माजलगाव, दि. 22 (लोकाशा न्यूज) : स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती यासारख्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. त्यांच्यासाठी नेत्यांनी गटतट बाजूला ठेऊन येणार्‍या निवडणुका एकदिलाने लढवून त्या ताब्यात घ्याव्यात असा आदेश खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना दिला.
येऊ घातलेल्या विविध निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठबांधणी करण्यासाठी सोमवारी (ता. 22) शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात आयोजित भाजपच्या कार्यकर्ता बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर भाजपचे रमेश आडसकर, मोहन जगताप, तालुकाध्यक्ष अरुण राउत, डॉ. प्रकाश आनंदगावकर, ज्ञानेश्वर मेंडके, बबनराव सोळंके, नितीन नाईकनवरे, गौरी देशमुख आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार मुंडे म्हणाल्या कि, नेत्यांच्या निवडणुकीला आणखी बराच अवधी असून आता पक्षात एकनिष्ठेने काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. प्रत्येक संस्था भाजपच्या ताब्यात घेण्यासाठी या निवडणुका सर्वांनी एकत्रित येऊन लढायच्या आहेत. कोणीही गटबाजी न करता पक्ष नेतृत्वाला जे योग्य वाटेल त्याला उमेदवारी देण्यात येईल. त्या अगोदर उमेदवाराची पात्रता, पक्षाशी असलेली एकनिष्ठा आदी तपासूनच निवडणुकीचे तिकीट ज्यांना मिळेल त्यांना निवडणूक आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version