Site icon लोकाशा-बंब न्यूज

..तर उघडता येणार नाहीत दुकाने,जिल्हाधिकारी शर्मांचे नवे आदेश

बीड, दि.21 (लोकाशा न्युज) ः जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण राज्याच्या तुलनेत अत्यंत कमी असून हे वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्ह्यात अनेक निर्बंध घातले आहेत. व्यवसायिकांबरोबरच त्यांच्या कर्मचार्‍यांना लसीचा किमान एक डोस घेणे आवश्यक असून घेतला नसल्यास त्यांना दुकाने उघडता येणार नाहीत, शिवाय शासकीय-निमशासकीय कार्यालयात देखील लस घेतली नसल्यास (नो व्हॉक्सिन नो इंट्री) प्रवेश दिला जाणार नाही. शैक्षणिक संस्था, क्लासेससह इतर संस्थांमध्ये देखील लसीकरण केले नसल्यास प्रवेश नाकारला जाणार आहे. याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रविवारी दि.21 नोव्हेंबर रोजी रात्री काढले आहेत.

Exit mobile version