बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : खा. प्रीतमताई मुंडे ह्या बीड जिल्ह्यात पाच दिवसाच्या दौर्यावर येत आहेत. या दौर्यात ते नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाबरोबरच राष्ट्रीय महामार्गाच्या सद्यस्थितीमधील कामांचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेणार आहेत. तसेच याच दौर्यात त्यांच्या हस्ते गेवराई पंचायत समितीच्या नविन इमारतीचेही लोकार्पन केले जाणार आहे.
तत्कालिन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणला, तर त्यांच्याच खांद्याला खांदा लावून खा. प्रीतमताई मुंडे यांनीही केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी आणला, त्यामुळेच नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना गती मिळाली, सध्या राज्यात सत्ता नसली तरी मुंडे भगिणी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे योगदान देत आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळेच बीडकरांना भविष्यात नगर-बीड-परळी रेल्वे धावताना पहायला मिळणार आहे. फक्त विकास हाच ध्याय आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्या काम करीत आहेत. उद्या दि. 21 नोव्हेंबरपासून खा. प्रीतमताई मुंडे ह्या पाच दिवसाच्या बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. 21 नोव्हेंबर हा त्यांचा पुर्ण दिवस परळी येथे राखीव असणार आहे. सोमवारी सकाळी आकरा वाजता वडवणी येथील प्रिमीयर लिग 2021 च्या पारितोषीक वितरण समारंभास त्यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी एक वाजता माजलगाव येथील वैष्णवी मंगल कार्यालयात होणार्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यास त्यांची उपस्थिती राहणार आहे. मंगळवारी सकाळी बीडमध्ये त्या पत्रकार परिषदेव्दारे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. बुधवारी दुपारी एक वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाबरोबरच राष्ट्रीय महामार्ग सद्यस्थितीच्या कामाचा आढावा घेणार आहेत. या कामातील अडथळे लक्षात घेवून ते सोडविण्याची पुढची दिशा या बैठकीनंतर त्या निश्चित करणार आहेत. तर गुरूवारी गेवराई पंचायत समितीच्या नुतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास त्यांची उपस्थिती राहणार आहे. एकंदरितच त्यांचा पाच दिवसाचा हा दौरा, त्यांच्या बैठका बीड जिल्ह्याच्या विकासाला गती देणार्या ठरणार आहेत.
उद्यापासून पाच दिवस खा. प्रीतमताई बीड जिल्ह्यात, रेल्वे, राष्ट्रीय महामार्गाच्या कामांतील अडथळे दुर करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत घेणार बैठक तर गेवराई पं.स.च्या नुतन इमारतीचे ताईंच्या उपस्थितीत होणार लोकार्पण
