Site icon लोकाशा-बंब न्यूज

हा शेतकरी एकजुटीचा विजय- आ. सतीश चव्हाण


बीड,
-वादग्रस्त ठरलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. हे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकर्‍यांच्या मागण्यांपुढे दीड वर्षानंतर का होईना अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले. ‘देर आए मगर दुरूस्त आए’ असेच आज म्हणावे लागेल.

खरे तर कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा हा केंद्र सरकारचा पराभव असून शेतकरी एकजुटीचा मोठा विजय आहे. या एकजुटीमुळेच देशातील बळीराजाने हुकुमशाही मानसिकतेचे गर्वहरण केले आहे.

उत्तरप्रदेश, पंजाब आदी राज्यात आगामी होऊ घातलेल्या निवडणूका डोळ्या समोर ठेवून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असला तरी या निवडणूकांत बळीराजा भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही…
-आ.सतीश चव्हाण

.

Exit mobile version