Site icon लोकाशा-बंब न्यूज

शेतकर्‍यांनी अत्यंत प्रमाणिकपणे दिलेल्या लढ्याचं हे यश – अ‍ॅड प्रज्ञा खोसरे, मोदींनी आधीच निर्णय घेतला असता तर ‘त्या’ शेतकर्‍यांचे प्राण वाचले असते अन् इतर शेतकर्‍यांचे हालही झाले नसते



बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशावर तीन कृषी कायदे लादले होते, या तिन्ही कायद्यांना देशभरातून कडाडून विरोध झाला, यामध्ये अनेक शेतकर्‍यांना आपले प्राण गमवावे लागले, परिणामी शेतकर्‍यांचा आक्रोश पाहूणच मोदींनी हे कायदे रद्द केल्याचे शुक्रवारी जाहिर केले, मोदींनी घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या अ‍ॅड प्रज्ञा खोसरे यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रीया नोंदविली आहे. शेतकर्‍यांनी अत्यंत प्रमाणिकपणे दिलेल्या लढ्याचं हे यश आहे. मोदींना हा निर्णय आधीच घेतला असता तर आंदोलनात उतरलेल्या ‘त्या’ शेतकर्‍यांचे प्राण वाचले असते आणि इतर शेतकर्‍यांचे हालही झाले नसते, असे अ‍ॅड. खोसरेंनी म्हटले आहे.

जनतेच्या, शेतकर्‍यांच्यावर प्रश्‍नावर अ‍ॅड. प्रज्ञा खोसरे ह्या नेहमीच आवाज उठवितात, मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांनाही त्यांनी कडाडून विरोध केला, शुक्रवारी मोदींनी हेच कायदे रद्द केल्याचे जाहिर केल्यानंतर अ‍ॅड खोसरेंनी सोशल मिडीयावर आपले मत व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्याच्या केलेल्या घोषणेचं मनापासून स्वागत करते. देशभरातील शेतकर्‍यांनी अत्यंत प्रमाणिकपणे दिलेल्या लढ्याचं हे यश आहे. सरकारने हा निर्णय आधीच घेतला असता तर शेकडो शेतकर्‍यांचे प्राण वाचले असते व त्यांचे हालही झाले नसते, असे त्यांनी आपल्या या पोष्टमध्ये म्हटले आहे.
Exit mobile version