Site icon लोकाशा-बंब न्यूज

सीईओंच्या संकल्पनेला स्मार्ट ग्रामच्या ग्रामस्थांची खंबीरपणे साथ ! लोकसहभाग अन् श्रमदानातून वान नदीवर उभारले दोन वनराई बंधारे


धारूर, दि. 19 (लोकाशा न्यूज) : सीईओ अजित पवार हे सकारात्मक दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून काम करणारे अधिकारी आहेत, त्यामुळे बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या विकास कामांना गती मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांच्याच संकल्पनेला स्मार्ट ग्राम म्हणजेच आवरगावकरांची सातत्याने साथ मिळत आहे. त्यांच्या एका आवाहनावर आवरगावकरांनी लोकसहभाग आणि श्रमदानातून वान नदीवर दोन वनराई बंधारे उभारले आहेत. ग्रामस्थांच्या याच कामाचे आता सर्वस्तरातून कौतूक केले जात आहे.
तालुक्यातील आवरगाव हे जिल्ह्यात स्मार्ट ग्राम ठरलेले आहे. तेंव्हापासून या गावातील नागरिक लोकसहभागातून होणार्‍या प्रत्येक कामाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्यानुसार या गावातील काम पाहूणच जिल्हा परिषदेचे माजी सीईओ अजित कुंभार आणि आजी सीईओ अजित पवार या दोघांनाही भेट दिलेली आहे. तसेच सीईओ पवार यांच्या संकल्पनेतूनच शुक्रवारी आवरगाव (ता.धारुर) येथे लोकसहभागातून ग्रा.पं. व महिला बचत गटाच्या श्रमदानातुन वान नदीवर दोन वनराई बंधारे उभारली आहेत. या कामात पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी डी.व्हि.माने आणि ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. दरम्यान वान नदीवर उभारण्यात आलेले हेच दोन वनराई बंधारे गावकर्‍यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.

Exit mobile version