Site icon लोकाशा-बंब न्यूज

आता सिंदफणा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करता येणार नाही, नदी पात्रालगतचे रस्ते केले बंद, रस्त्यांच्या कामाची मंडळ अधिकारी नितीन जाधव यांनी केली पाहणी


बीड, दि. 17 : 17 नोव्हेम्बर रोजी माननीय उपविभागीय अधिकारी श्री.नामदेव टिळेकर, साहेब यांच्या आदेशावरून तहसीलदार बीड श्री.सुरेंद्र डोके साहेब यांच्या निर्देशानुसार सिंदफणा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन होण्यापासून मज्जाव करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी श्री नितीन जाधव, मंडळाधिकारी,तलाठी श्री उमेश खींड्ररे श्री. विष्णू थापडे तसेच मोजे कूकडगाव ग्रामपंचायत सरपंच श्री.वशिष्ठ कुटे, सरपंच मोजे बराणपुर श्री.माने, सरपंच प्रतिष्ठित नागरिक यांच्या समक्ष अवैध वाळू उत्खनन होऊ नये या दृष्टीने नदीपात्रालगतचे रस्ते अवैध वाहतूक होऊ नये यासाठी बंदी करून पायबंद घातला आहे, दिनांक रोजी प्रत्यक्ष सिंदफणा नदीच्या पात्राची पाहणी करण्यात आली सदर ठिकाणी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत होत नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे सिंदफणा नदीपात्रामध्ये जाणारा रस्ता जेसीबीच्या साह्याने खोदण्यात आला त्यामुळे भविष्यात होणारे अवैध वाळू उत्खनन व वाहतूक यास प्रतिबंध होण्यास मदत होईल करिता पंचांसमक्ष पंचनामा केला जमा करून तहसीलदार यांना सादर केला आहे.

Exit mobile version