Site icon लोकाशा-बंब न्यूज

झेडपीच्या आरक्षणात मातब्बरांची होणार गोची!पिंपळनेर, चौसाळा, कडा, धोंडराई, विडा, गंगामसला, भोगलवाडी, पट्टीवडगाव गट एससी तर युसूफ वडगाव एसटीसाठी आरक्षीत होणार?


बीड/नांदुरघाट, दि. 15 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर आली आहे. कोणत्याही क्षणी या निवडणूकीचा प्रोग्रॅम लागू शकतो, त्यानुसारच या निवडणूकीत मातब्बर नेते आणि विद्यमान सदस्यांची मोठी गोची होण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातील पिंपळनेर, चौसाळा, कडा, धोंडराई, विडा, गंगामसला, भोगलवाडी आणि पट्टीवडगाव हे गट एससीसाठी तर युसूफ वडगाव हा गट एसटीसाठी आरक्षीत होण्याची शक्यता आहे. हे सर्वच नेत्यांना माहित आहे, त्यामुळेच आरक्षण निश्‍चित होईपर्यंत झेडपीच्या विद्यमान सदस्यांचा जीव मात्र भांड्यात आडकला आहे.
मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते, याच मिनी मंत्रालयाच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. फेब्रुवारी महिण्यात जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपणार आहे. प्रत्येकाला चिंता आहे आपला गट सुरक्षित राहावा, मात्र बर्‍याच ठिकाणी मोठे फेरबदल होण्याची संभावना आहे. 2011 च्या जनगणनेनुसार एससीच्या उतरत्या क्रमाच्याआधारे बीड तालुक्यातील पिंपळनेर आणि चौसाळा हे अनुसूचित जातीसाठी राखीव राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच आष्टी तालुक्यात कडा, गेवराई तालुक्यात धोंडराई, केज तालुक्यातील विडा, माजलगाव तालुक्यातील गंगामसला, धारुर तालुक्यातील भोगलवाडी व अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव हेही गट अनुसूचित जातीसाठी 2011 च्या जनगणनेनुसार उतरत्या क्रमांकाच्या आधारे 2022 चे संभाव्य जिल्हापरिषद आरक्षित गट राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केज तालुक्यातील युसुफ वडगाव हा गट एकमेव गट एसटीसाठी आरक्षीत राहण्याची शक्यता आहे. आरक्षणाची सोडत लवकरच होईल परंतू सदरील संभाव्य आरक्षित गट राहू शकतात, त्यामुळे या गटावर प्रस्थापित पुढार्‍यांचे वर्चस्व जे होते त्याला सुरुंग लागून नवीन चेहरा त्या भागाचे नेतृत्व करतील, त्यामुळे काही गटात कही खुशी कही गम असे चित्र पहावयास मिळेल.

..तर या सदस्यांना शोधावा लागणार नवा गट
जिल्हा परिषदेचे आठ गट एससीसाठी तर एक गट एसटीसाठी आरक्षीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगल सोळंके (गंगामसला), विजयकांत मुंडे (विडा), मंगल डोईफोडे (पिंपळनेर), अशोक लोढा (चौसाळा), बोरकर (धोंडराई), भारती तिडके (भोगलवाडी), आशा दौंड (पट्टीवडगाव) आणि सारिका सोनवणे (युसूफवडगाव) या विद्यमान सदस्यांना नवा गट शोधावा लागणार आहे. यातील पाच सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे दोन सदस्य भाजपचे तर एक सदस्य माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या गटाचा आहे. तर कडा या गटातून बाळासाहेब आजबे हे जि.प.सदस्य होते, ते आमदार झाल्यानंतर हा गट रिक्त झालेला आहे. हाही गट एससीसाठी आरक्षीत होण्याची शक्यता आहे. यातील

Exit mobile version