Site icon लोकाशा-बंब न्यूज

अंबाजोगाईच्या शासकिय धान्य गोदामाचा आ. नमिता मुंदडांनी केला पंचनामा, पन्नास किलोच्या पोत्यात आढळले 47 किलो धान्य, तिन किलो धान्य गायब, घोटाळेबाजांवर कारवाई करण्याचे आ मुंदडांचे आदेश


अंबाजोबाई, दि. 15 (लोकाशा न्यूज) : अंबाजोगाईतील शासकिय धान्य गोदामावर अचाणक भेट देवून आ. नमिता मुंदडा यांनी त्या गोदामाचा पंचनामा केला, यावेळी पन्नास किलोच्या पोत्यात 47 किलो धान्य आढळून आले, एका पोत्यामध्ये तिन किलो धान्य गायब असल्याचे समोर आल्यानंतर सदर घोटाळेबाजांवर कडक कारवाई करा, असे आदेश यावेळी आ. नमिता मुंदडांनी संबंधित यंत्रणेला सोडले आहेत. त्यांच्या एका आदेशाने घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत.

सोमवारी आ. नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाईतील शासकिय धान्य गोदामावर अचानक भेट दिली. यावेळी त्या ठिकाणी धान्य चोरीचा गंभीर प्रकार उघड झाला. धान्याचे एक पोते 50 किलोचे असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्येक पोत्यात जवळपास तीन किलो धान्य गायब असल्याचे समोर आले. सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काचे धान्य अशा रितीने पळविले जात आहे, गोदामाच्या वेगवेगळ्या भागातून पोते निवडून गोदाम व्यवस्थापकासमोर इलेक्ट्रॉनिक काट्यावर या पोत्यांचे वजन केले असता 47 किंवा 48 किलो असे वजन भरत होते. असे सुमारे 80 टक्के पोत्यातील धान्य चोरण्याचा गैरप्रकार आ. नमिता मुंदडांनी उघडकीस आणला आहे. या घोटाळ्याचा पंचनामा पुर्ण होईपर्यंत आ. मुंदडांनी दुपारचे जेवनही गोदामातच उरकले. तहसिलदारांनी पंचनामा केल्यानंतर आ. मुंदडांनी गोदाम सोडले, आ. मुंदडांनी केलेल्या पंचनाम्यामुळे धान्य पळविणार्‍यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, तहसलिदार आणि नायबतहसिलदारांचीही उपस्थिती होती.
Exit mobile version