परळी ।दिनांक १५।
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळेच आजच्या तरूण पिढीपर्यंत पोहोचले, त्यांच्या निधनाने साहित्य विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पुरंदरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन दुःखदायक आहे, अनेक वेळा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचेसोबत व्यासपीठावर बसण्याचा आणि त्यांच्याशी चर्चा करण्याचा मला योग आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन आजच्या तरुणांपर्यंत मुर्तीमंत रितीने साकारण्याचं मोलाचं काम त्यांनी केलं, एवढं प्रेम त्यांचं त्यांचेवर होतं. ते शिवशाहीर तर होतेच पण शिवरायांचं गड किल्याचं जतन करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं, त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे असं पंकजाताई यांनी म्हटलं आहे.
••••
