Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी उन्हाळी बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी व्हावे, महाबीजने केले शेतकर्‍यांना आवाहन


बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चालू वर्षी झालेला सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे सोयाबीन बीजोत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित झालेले आहे. त्यामुळे खरीप हंगाम 2022 करिता सोयाबीन प्रमाणित बियाण्याची गरज व तुटवडा लक्षात घेऊन राज्य शासनाच्या तथा कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या. अकोला (महाबीज) मार्फत राज्यभर रब्बी-उन्हाळी हंगाम 2021 -2022 करिता प्रमाणित सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तरी बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या बीजोत्पादन  योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन बीड महाबीजचे, जिल्हा व्यवस्थापक जे.बी. गिरी यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील विशेषतः सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होणे करिता जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिकारी तथा जिल्हा व्यवस्थापक, महाबीज,बीड यांना खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधून बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होऊन लवकरात लवकर प्रति एकर 100 रुपया प्रमाणे रक्कम भरून बियाणे आरक्षित करून घावे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, बीड-8669642718, क्षेत्रिय अधिकारी, बीड-9420013448,9309795321 तालुके- बीड ,पाटोदा, आष्टी,शिरूर कासार,गेवराई, वडवणी व माजलगाव, क्षेत्रीय अधिकारी -अंबाजोगाई, तालुके- 7972592023,8983181489 तालुके- अंबाजोगाई , परळी, केज व धारूर, क्षेत्र सहायक  माजलगाव-9423473118, 9822211563, सदरहू बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होणे करिता एका गावात कमीत कमी 15 एकर बीजोत्पादन कार्यक्रम होणे अपेक्षित असून, एका शेतकर्‍याने कमीत कमी 2 एकर क्षेत्र नोंदणी तथा पेरणी  करणे अनिवार्य असून 10 जानेवारी 2022 पर्यंत पेरणी/लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना बीजोत्पादन योजनेत सहभागी होता येणार आहे.  पेरणी करिता लागणारे पायाभूत बियाण्याचा पुरवठा महाबीज कार्यालयामार्फत शेतकर्‍यांना करण्यात येणार असून,  बियाणे शुल्क शेतकर्‍याने बियाणे उचल करणे पूर्वी जिल्हा कार्यालयात भरणे अनिवार्य आहे.  उत्पादित सोयाबीन बियाणे खरेदी करिता महाबीज मुख्यालयाकडून आकर्षक असे खरेदी धोरण जाहीर करण्यात आलेली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी महाबीज बिजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आव्हान जिल्हा कार्यालय महाबीज, बीड, यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सदरहू योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उन्हाळी बीजोत्पादन करिता जिल्ह्यास आवंटीत
झालेले सोयाबीन वाण
फुले संगम-(घऊड-726).
फुले किमया
चAणड-612
चAणड-158
चAणड-162

Exit mobile version