परळी, दि. 9 (लोकाशा न्यूज) : येथील उद्योजक अजय शांतीलाल लुंकड यांच्या संशयास्पद मृत्यू चा उलगडा झाला असून परळी शहर पोलिसांनी खाक्या दाखवताच मयत अजय लुंकड यांच्या मुलाने आपणच आपल्या वडिलांची गळा दाबून हत्या केली असल्याची कबुली दिली आहे. ह्या प्रकाराने शहरात एकच खळबळ माजली असून विश्वास कोणावर ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शांत व सु- स्वभाव असलेल्या अजय लुंकड यांच्या मृत्यूने मात्र शहरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलास गजाआड केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी शहरातील विद्यानगर भागात राहत असलेले तरुण उद्योजक अजय शांतीलाल लुंकड यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यावेळी गळफास घेऊन आत्महत्या केल्या बाबतची नोंद शहर पोलिस ठाण्यांमध्ये करण्यात आली होती. मात्र शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मनामध्ये सारे संशयाचे वातावरण फिरत होते त्यानुसार त्यांनी तात्काळ शव विच्छेदन अहवाल मागवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा संशय खरा ठरला. उद्योजक अजय लुंकड यांचा मृत्यू जवळपास घेऊन नाही तर गळा दाबून त्यांची हत्या त्याबाबतचा अहवाल शहर पोलिस ठाण्याला प्राप्त झाला. अहवालानुसार शहर पोलीस ठाण्यांमध्ये साहेबराव पल्लेवाड यांच्या फिर्यादीनुसार गु. र. नंबर 182 कलम 302 नुसार संशयितांवर खुनाचा गुन्हा व पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला व तपास पो नी उमाशंकर कस्तुरे यांनी पोलीस उपनिरीक्षक भार्गव सपकाळ त्यांच्याकडे दिला. त्यातच गुन्हा कोणताही असो त्याचा उलगडा करण्याची पूर्ण क्षमता असलेले शहर पोलिस ठाण्याचे डीबी शाखेचे प्रमुख भास्कर केंद्रे यांनी खुनाचा गुन्हा उलगडा करण्याची जबाबदारी स्वीकारल्यागत संशयावरून मयत उद्योजक अजय लुंकड यांचा कॉम्प्युटर सायन्सचे औरंगाबाद या ठिकाणी शिक्षण घेत असलेला 19 वर्षीय सिद्धार्थ लुंकड यास ताब्यात घेतले व पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगवान फिरवीत आरोपीस खाक्या दाखवताच सिद्धार्थ याने आपणच आपल्या वडिलांची गळा दाबून हत्या केली असल्याची स्पष्ट कबुली दिली. आपले व वडिलांचे कधीच जमत नव्हते, वडील आपल्याकडे लक्ष देत नव्हते, वडलांनी आपणावर कधीच प्रेम केले नाही, आपल्या व मोठ्या भावात वेळोवेळी भेदभाव करत होते या कारणास्तव आपला रोज होता व म्हणूनच आपण वडिलांची गळा दाबून हत्या केली अशी स्पष्ट कबुली दिली. तरुण उद्योजक अजय शांतीलाल लुंकड हे अत्यंत शांत वृत्तीचे, सोज्ज्वळ स्वभावाचे असल्याकारणाने आणि त्यांची हत्या त्यांच्या मुलाने करावी ही अत्यंत दुर्भाग्यमय असून शहरांमध्ये मात्र हळहळ व्यक्त होत आहे. आता विश्वास कोणावर ठेवावा असाही गंभीर प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.
परळीतील उद्योजक अजय लुंकड यांची हत्याच,क्षुल्लक कारणावरून निर्दयी मुलानेच बापाचा गळा दाबून काढला काटा; डीबी शाखेचे भास्कर केंद्रे यांनी खाक्या दाखवताच झाला खुनाचा उलगडा
