Site icon लोकाशा-बंब न्यूज

कर्मचाऱ्यांना धक्का लावाल तर याद राखा,खा.प्रितमताईंनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास भाजपाचा खंबीर पाठिंबा – राजेंद्र मस्के


बीड, दि.4 प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास बीड जिल्हा भाजपने खंबीरपणे पाठिंबा दिला आहे, तर दुसऱ्या बाजूने या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सत्ताधारी आणि एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी दबाव आणत आहेत, या दडपशाहीचा खासदार प्रीतमताई आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. या अनुषंगानेच खा.प्रितमताई मुडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावुन खडेबोल सुनावले आहे. राज्यात चालु असलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या संपात बीड आगारातील एसटी कर्मचारी उतरले आहेत. हा संप दडपण्यासाठी विभाग नियंत्रक यांनी कर्मचाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. संप हा कमगार व कर्मचाऱ्यांचा मुलभुत हक्क आहे. त्यांच्या मागण्या सरकार ऐकून घेत नसेल तर त्यांना संपाचे शस्त्र हाती घ्यावे, लागेल कोणताही दबाव टाकुन संप करण्यापासुन रोखता कामा नये कर्मचाऱ्याचे या संपास भारतीय जनता पार्टीचा पाठीबा असुन लोकशाही मार्गाने संप करण्याचा त्यांचा अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन नये, अशा शब्दात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे, या वेळी वेतन वाढ करुन मागील थकबाकी देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या 10 दिवसापासुन राज्यात विविध ठिकाणी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे उत्सर्फु आंदोलन चालु आहे. मात्र सरकारला कर्मचाऱ्यांच्या मागण्यांनकडे लक्ष देण्यास सवड नाही. तर चुकीचे काम करणाऱ्या अपराध्यांना अभय देण्यात हे सरकार कार्यरत आहे. शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी होत असताना एसटी कर्मचाऱ्यावरही ऐन दिवाळी आंदोलनाची वाईट वेळ आली आहे. राज्य सरकारच्या पापाचा घडा भरला असुन हे शेतकरी, कर्मचारी, व सामान्य जनतेसाठी निष्क्रीय सरकार ठरले. शेतकऱ्याच्या आत्महत्या नंतर आता एसटी महामंडाचे कर्मचारी ही आत्महत्या करुन लागले आहेत. या घटना राज्यासाठी दुर्दैवी आहेत. मविका आघाडी सरकारच्या राज्यात आज कोणीही सुखी आणि समाधानी नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा रास्त व न्याय हक्काच्या मागण्यासाठी असताना हा संप वरीष्ट आधिकाऱ्यांच्या मार्फत उधळण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय जनता पार्टीचा या संपास खंबीर पाठींबा आहे. कर्मचाऱ्यास धक्का लागल्यास याद राखा असा ईशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिला आहे.
संघटना विरहीत उत्सर्फुपणे एसटी कर्मचारी संपात उतरले आहेत. बीड येथे हे संप चालु असुन आज दिवाळीच्या सणा दिवशी बीड आगारातील 200 पेक्षा जास्त कर्मचारी संपात उतरल्याने बीड डेपोचा कारभार ठप्प झाला आहे. बीड मधील संप उधळण्यासाठी एसटी महामंडळाचे वरीष्ट अधिकारी हे बळजबरीचा प्रयत्न करत आहेत. या बाबीची गंभीर दखल घेऊन खासदार प्रीतमताईंनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले, तर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे जेष्ट पदाधिकारी अडॅ.सर्जेराव तांदळे, भगीरथ बियाणी, स्वप्निल गलधर, किरण बांगर, बालाजी पवार, शांतीनाथ डोरले, भुषण पवार, विलास बामणे, अशोक पांढरे, गणेश तोडेकर, कपील सौदा यांनी संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या संपाला जाहीर पाठींबा दिला आहे.

Exit mobile version