बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : प्रश्न कोणताही असो..तो सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा समन्वयक सौ. प्रज्ञा खोसरे ह्या आपली टीम घेवून सदैव तत्पर असतात. वाढत्या महागाई विरोधातही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर आणि आ. संदीप भैया क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली
बीड जिल्ह्यामध्ये गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केले आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षांमार्फत त्यांनी देशाच्या पंतप्रधानांना आपल्या मागण्यांचे पत्र पाठविले आहे. जोपर्यंत महागाई कमी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचे अॅड प्रज्ञा खोसरे यांनी म्हटले आहे.
वाढत्या महागाईमुळे जनतेचे निघाले दिवाळे, महागाई विरोधात बीड राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने गांधीगिरी स्टाईलने केले आंदोलन, भाजपच्या जिल्हाध्यक्षांमार्फत पंतप्रधानांना पाठविले मागण्यांचे निवेदन, जोपर्यंत महागाई कमी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही – अॅड प्रज्ञा खोसरे
