Site icon लोकाशा-बंब न्यूज

खाडेवाडीतील पूजा जालिंदर चाटे हिने नीटच्या परीक्षेत मिळवले 526 गुण

माजलगाव तालुक्यातील खाडेवाडी येथील पूजा जालिंदर चाटे या विद्यार्थ्यीनीने वैद्यकीय पूर्वपरीक्षेत यश मिळवत निट परिक्षेत सातशे वीस गुणांपैकी ५२६ गुण मिळवून एमबीबीएस साठी पाञ ठरली आहे. या यशाबद्दल तीचे सर्वञ कौतूक होत आहे.
दिंद्रुड पासुन जवळच असलेल्या खाडेवाडी ता माजलगाव येथील पूजा जालिंदर चाटे हिने यंदा वैद्यकीय पुर्व परीक्षेसाठी निटची परिक्षा दिली होती. सदर परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असुन, ७२० गुणांपैकी ५२६ गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. पूजा ही खाडेवाडी सारख्या ग्रामीण भागातील असुन,तिचे प्राथमिक शिक्षण तेथील जि. प. प्राथमिक शाळेत झाले. तर ५ वी ते 7 वी शिक्षण दिंद्रुड येथील माध्यमिक विद्यालयात झाले. तर इयत्ता 8 वी ते 10 वीपर्यंतचे शिक्षण अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयात झाले. इयत्ता दहावीमथ्ये 97.60 टक्के गुण घेत तिने लातूर येथील शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळवला. सुरूवाती पासुनच डाॅक्टर होण्याचे स्वप्न बाळगत त्यादृष्टीने तीने तयारी चालु केली होती. दिवस रात्र अभ्यास करून वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे या ध्यासापोटी तिने हे यश मिळवल्याचे ती सांगते. यासाठी वडिल जालिंदर चाटे यांनी तीला प्रोत्साहन दिले होते. तिने मिळवलेल्या यशाची बातमी ऐकुन तिच्या आईवडिलांसह कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिच्या या यशाबद्दल त्याचे सर्वञ होत आहे.

Exit mobile version