वडवणी, :- १३ वर्षीय मुलीला किराणा दुकानात बोलावून अकृत्य करत बळजबरीने बलात्कार केल्याची घटना चिंचोटी येथे घडली असून वडवणी पोलीसांनी आरोपी बेड्या ठोकल्या आहत.तर पिडित मुलीची व कुंटुबियांची माजलगांव विभागीय पोलीस आधिकारी जयभाय यांनी भेट घेतली असून या घटनेनी तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.
वडवणी पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार,वडवणी तालुक्यातील मौजे चिंचोटी येथील गणेश संदिपान गोंडे वय २० वर्षे यांचे स्वताच्या गांवातच किराणा दुकान आहे.अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या दलित समाजाच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला गोड बोलावून तिच्या अंगाशी बेताल कृत्य करत चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला असल्याने पडित मुलीच्या चुलतीच्या फिर्यादीवरुन आरोपी गणेश संदिपान गोंडे यांच्यावर बल्काराचे ३७६ कलमा प्रमाणे अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि बाल लैंगिक अत्यचार प्रतिबंधक कायदा आणि अँट्रोसिटी प्रमाणेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अवघ्या काही तासातच वडवणी पोलीसांनी बेड्या ठोकल्या आसून आज सकाळी माजलगांवचे उपविभागीय पोलीस आधिकारी जयभाय यांनी भेट घेतली आहे.तर सदरील घटनेमुळे या परिसरासह तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली आसुन या नराधमावर शासनाने कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी समाजस्तरातून केली जात आहे.
