Site icon लोकाशा-बंब न्यूज

नागेशवाडी शिवारात डेथ बॉडी सापडली,घटनास्थळी डीवायएसपी विजय लगारे ,पीआय मनिष पाटील यांची धाव

अंमळनेर (लोकाशा न्युज ) पाटोदा तालुक्यातील नागेशवाडी शिवारात रविवारी पुरुष जातीच्या इसमाची डेथ बॉडी आढळून आल्यानंतर पाटोदा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी डीवायएसपी विजय लगारे पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील पीएसआय अफरोज पठाण यांनी तात्काळ धाव घेतली होती.

पाटोदा पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या नागेशवाडी येथील संतोष रावसाहेब थोरवे हे मृतावस्थेत रविवारी त्यांच्या स्वताच्या रानात आढळून आल्यामुळे नागेशवाडी परिसरात एकच खळबळ उडाली होती रावसाहेब थोरवे यांची डेथ बॉडी रानात पडलेली असल्याची माहिती पाटोदा पोलिसांना मिळताच पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील ,पीएसआय पठाण पोलीस कर्मचारी सुनिल सोनवणे ,बाळू सानप ,तांबे ,टेकाळे यांनी धाव घेतली होती.

नागेशवाडी येथे रानात थोरवे यांची डेथ बॉडी सापडली त्या ठिकाणच्या जागेची व त्या ठिकाणी असणाऱ्या टँक्टरची पहाणी देखील डीवायएसपी विजय लगारे ,पीआय मनिष पाटील ,पीएसआय पठाण यांनी बारकाईने केली .

नागेशवाडी शिवारात सापडलेल्या संतोष थोरवे यांच्या डेथ बॉडीच्या चेहऱ्यावर देखील जखम झालेली दिसुन येत असल्यामुळे डीवायएसपी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील हे त्या दिशेने देखील बारकाईने तपास करत आहेत .

—–चौकट

नागेशवाडी येथील संतोष थोरवे यांचा अपघात हि घातपात अशा सर्व बाबी तपासून या प्रकरणाचा बारकाईने तपास हा डीवायएसपी विजय लगारे व पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पठाण हे करत आहेत.

—चौकट

नागेशवाडी येथील संतोष थोरवे हे स्वताच्या शेतात टँक्टर द्वारे पेरणीचे काम करत होते यातच सदरील टँक्टर त्यांच्या अंगावर जाऊन ते मयत झाले असल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळ पहाणी केल्यानंतर दिसुन येत आहे .

Exit mobile version