Site icon लोकाशा-बंब न्यूज

‘येडेश्वरी’ कडून शेतकर्‍यांची दिवाळी गोड !धारूरमधील 215 सभासदांसाठी 2 टन साखर वाटपास तालुकाध्यक्ष अमोल जगताप यांच्या हस्ते सुरूवात


धारूर, दि. 28 (लोकाशा न्यूज) : दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. हेच लक्षात घेवून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी आपल्या
येडेश्‍वरी कारखान्याच्या माध्यमातून सभासद शेतकर्‍यांची दिवाळी गोड करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार धारूरमधील 215 सभासद शेतकर्‍यांना ह्या चार दिवसात 2 टन 150 किलो साखर वाटप केली जाणार आहे. बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल जगताप यांच्या हस्ते या साखर वाटपास सुरूवात करण्यात आली आहे.  
शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि तो कणा आम्ही मोडू देणार नाही, ज्या ज्यावेळी शेतकर्‍यांना अडचणी येतील त्या त्या वेळी आम्ही आणि आमचा पक्ष सक्षमपणे शेतकर्‍यांच्या पाठीशी उभा राहिल, त्यामुळे शेतकर्‍यांनी खचून न जाता तेवढ्याच ताकतीने उभा राहून काम करावे, असे यावेळी अमोल जगताप यांनी सांगितले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी बजरंग बप्पा यांच्या कामाचेही भरभरून कौतूक केले, यावेळी अशोक नखाते सर, अंकुश जगताप, अजित जगताप, मनोज नखाते, पिनू जगताप, अमोल जगताप यांच्यासह अनेक सभासद शेतकर्‍यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन  येडेश्‍वरी साखर कारखान्याचे कृषी सुपरवायझर कदम साहेब यांनी केले होते.

Exit mobile version