बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : सत्ता असो की नसो जिल्ह्याचा विकासच करायचा हे आपल्या डोळ्यासमोर ठेवून मुंडे भगिणी खर्या अर्थाने काम करीत आहेत. त्याचा फायदाही बीड जिल्ह्याला पावलोपावली होत आहे. लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात 29 ऑक्टोबर रोजी खा. प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते केज मतदार संघातील आठ कोटी 52 लाख रूपयांच्या विकास कामांचा श्रीगणेशा केला जाणार आहे. मुंडे भगिणींनी आणलेल्या निधीमुळे यापुर्वीही जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला गती मिळाली आणि सध्याही मिळत असल्याचे पहायला मिळत आहे.
खा. प्रीतमताई मुंडे ह्या तीन दिवस बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी आकरा वाजता परळी येथे स्वयंसिध्द महिला स्वयं रोजगार निर्मीती प्रशिक्षण केंद्र उपक्रमांतर्गत ब्युटीपार्लर प्रशिक्षणार्थींना त्यांच्या हस्ते साहित्याचे वाटप केले जाणार आहे. दुपारी एक वाजता पोहनेर येथे त्यांच्या हस्ते पंतप्रधान उज्वला गॅस योजनेंतर्गत गरजूंना उज्वला गॅसचे वाटप करण्यात येणार आहे. दुसर्या दिवशी दिवसभर त्यांचा केज मतदार संघामध्ये दौरा आहे. त्यानुसार 29 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता लव्हरी चिखल बीड, जिवाचीवाडी, लव्हरी, कानडीमाळी या डांबरीकरण रस्त्याचे (किंमत 2 कोटी 45 लाख) उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी दहा वाजता नाबार्ड योजनेअंतर्गत देवगाव, विडा, येवता, धारूर रस्त्यावरील नवीन पुलाचे (किंमत एक कोटी) उद्घाटन करण्यात येणार आहे. दुपारी साडे बारा वाजता दहिफळ, आंधळेवाडी, कोरडेवाडी ते टोकेवाडी या रस्त्याचे भुमिपुजन (किंमत 1 कोटी 32 लाख), आ. नमिताताई मुंदडा यांच्या आमदार निधीमधील बाळू मामा मंदिर सभामंडपाचे भुमिपुजन (किंमत पाच लाख) करण्यात येणार आहे. विडा येथे चौदवा वित्त आयोग अंतर्गत नविन समाज मंदिर बांधकामाचे उद्घाटन (किंमत सात लाख रूपये), समाज मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उद्घाटन (किंमत 3 लाख रूपये), बिरूबा मंदिरासमोरील सभामंडपाचे उद्घाटन (किंमत पाच लाख रूपये), आ. नमिता मुंदडा यांच्या आमदार फंडातून मातंग समाज मंदिर सभामंडपाचे भुमिपुजन (किंमत पाच लाख रूपये), सुर्य मंदिर ते सर्व टेकडे सभामंडपाच्या (किंमत पाच लाख) कामाचा यावेळी खा. मुंडेंच्या हस्ते श्रीगणेशा केला जाणार आहे. दुपारी आडीच वाजता देवगाव येथे रेणूकामाता मंदिराकडे जाणार्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भुमिपुजन (किंमत 20 लाख), दुपारी पावणे तीन वाजता दहिफळ वड येथे आंधळेवाडी, कोरडेवाडी ते टोकवाडी रस्त्याच्या मजबुतीकरण, डांबरीकरण, सुधारणा या कामाचे भुमिपुजन (किंमत 3 कोटी 95 लाख रूपये) खा. मुंडेंच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी ग्रामपंचायत स्तरावरील नरेगा अंतर्गत वृक्ष लागवडही केली जाणार आहे. दुपारी साडे तीन वाजता लिंबाचीवाडी येथे 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत सिमेंट रस्ता तयार करणे (तीन लाख रूपये), जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी फिल्टर बसवणे (किंमत एक लाख), अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी पाणी फिल्टर बसवण्याच्या (किंमत एक लाख) कामाचा खा. मुंडेंच्या हस्ते श्रीगणेशा केला जाणार आहे. दुपारी साडे चार वाजता पिंपळगाव येथील सिमेंटच्या बंधार्याचे (किंमत दहा लाख) उद्घाटन, रोमणवस्ती येथील नविन सभामंडपाच्या बांधकामाचे (किंमत पाच लाख) उद्घाटन, सार्वजनिक स्मशानभुमी आर.सी.सी.रोड बांधकामाचे (किंमत पाच लाख) भुमिपुजन तसेच आ. मुंदडांच्या आमदार निधीमधून येडेश्वरी मंदिरासमोरील सभामंडळापचे भुमिपुजन (किंमत पाच लाख) खा. मुंडेंच्या हस्ते केले जाणार आहे. सायंकाळी सहा वाजता अंबाजोगाई येथील खोलेश्वर विद्यालयामधील केंद्र सरकाच्या अॅटो इनोव्हेशन मिशन अंतर्गत अटल रिकरींग लॅबचेही खा. मुंडेंच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. तिसर्या दिवशी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता खा. मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात एनआरएचएमची बैठक घेणार आहेत. दरम्यान लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात खा. प्रीतमताईंच्या हस्ते श्रीगणेशा होत असलेल्या या साडे आठ कोटींच्या कामांमुळे ग्रामीण विकासाला गतीने चालणा मिळणार आहे. हे जिल्ह्यासाठी मोठ्या फायद्याचे ठरणार आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला गती ! साडे आठ कोटींच्या कामांचा खा. प्रीतमताईंच्या हस्ते होणार श्रीगणेशा
