Site icon लोकाशा-बंब न्यूज

पाहिजे व फरार १४ आरोपी अभिलेखावरून कमी करण्यात बीड पोलीसांना यश

बीड, दि. 26 . मा . विशेष पोलीस महानिरीक्षक , औरंगाबाद परिक्षेत्र , औरंगाबाद यांनी पाहिजे व फरार आरोपी , स्टैंडींग वॉरंट बाबत आढावा घेवून बीड जिल्हा अभिलेखावरील संख्या कमी करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या . त्याअनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक , बीड यांनी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन व स्था.गु.शा. यांना पाहिजे व फरार आरोपी अटक करणेबाबत सक्त सुचना दिल्या होत्या . त्याअनुषंगाने दिनांक १३/०२/२०२१ रोजी पासून जिल्हयात पाहिजे व फरार आरोपीतांना अटक करण्याची विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे . विशेष मोहिम यशस्वी होण्यासाठी स्था.गु.शा.कडून जिल्हयातील सर्व पो.स्टे . अंतर्गत राहणारे ( १०२ ९ ) पाहीजे , ( ११ ९ ) फरार व स्टँडींग वॉरंट मधील ( ८२ ) आरोपींच्या पो.स्टे . च्या बीट व बीट अंतर्गत गावनिहाय याद्या तयार करुन सर्व पो.स्टे.ला पाठविण्यात आल्या आहेत . सर्व पो.स्टे . प्रभारी अधिकाऱ्यांना सदर आरोपींच्या नावाच्या याद्या एका मोठया फ्लेक्सवर लावून तो फ्लेक्स पोलीस स्टेशनच्या समोर दर्शनिय भागात लावून फ्लेक्सवर आरोपींचे यादी खाली , यादीतील आरोपी हद्दीत राहत असल्याचे दिसून आल्यास पोलीसांना कळविणे बाबत नागरिकांना आव्हान करुन , त्याखाली संबंधीत पो.स्टे . प्रभारी अधिकारी , नियंत्रण कक्ष बीड , तसेच पो.नि.स्था.गु.शा. यांचे फोन क्रमांक देणे बाबत आदेशीत केले आहे . सदर मोहिमे दरम्यान जास्तीत जास्त आरोपी पकडून त्यांचेकडे तपास करुन पिडीतांना लवकर न्याय मिळावा या उद्देशाने सदरची मोहिम राबविण्यात येत आहे . या मोहिमे अंतर्गत माहे ऑक्टोंबर २०२१ मध्ये दिनांक २५/१०/२०२१ रोजी पावेतो पाहिजे व फरार एकुण १४ आरोपीतांना अभिलेखावरून कमी करण्यात बीड पोलीसांना यश आलेले आहे . त्यापैकी काही गंभीर गुन्हयात अटक केलेले आरोपी खालील प्रमाणे .. १ ) पो.स्टे . संभाजीनगर गुरनं १४४/२०१८ क .३०२ , ३०७ , १४३ , १४७ , १४८,१४ ९ , ५०६ भादंवि सह ४ / २५ भारतीय हत्यार कायदा सहक १३५ म.पो.का. मध्ये मागील ०३ वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी नामे सुदीप उर्फ पाप्या पि . रावसाहेब सोनवणे रा . परळी वै . यास दिनांक ०२ / १० / २०२१ रोजी शिताफिने अटक केली २ ) पो.स्टे . परळी ग्रामीण गुरनं १४७ / २०२० क . १८८ , २६ ९ , २७० , २७१ मध्ये एक वर्षापासून पाहिजे अस आरोपी १ ) राजाभाऊ उत्तम गित्ते रा.नंदागौळ ता.परळी वै . व २ ) भागवत राजाभाऊ गित्ते रा.नंदागौळ ता.परळी वै . यांना दिनांक ०३/१०/२०२१ रोजी अटक करण्यात आली आहे . ३ ) पो.स्टे . अंमळनेर गुरनं १८/२०१६ क .३७ ९ , ४११ भादंवि मध्ये मागील पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपी छत्रभुज उर्फ शत्रुघ्न मोहन मोरे यास दिनांक ०६/१०/२०२१ रोजी शिताफिने अटक करण्यात आली.
३ ) पो.स्टे . अंमळनेर गुरनं १८/२०१६ क .३७ ९ , ४ ९ १ भादंवि मध्ये मागील पाच वर्षांपासून फरार असलेला शत्रुघ्न मोहन मोरे यास दिनांक ०६/१०/२०२१ रोजी शिताफिने अटक करण्यात आली आरोपी छत्रभुज उर्फ आहे . ४ ) पो.स्टे . पाटोदा गुरनं २४६/२०२० क .३०७ , १४३ , १४७ , १४८ , १४ ९ , ५०४ भादंवि सह ४ / २५ आर्म अॅक्ट मध्ये मागील एक वर्षापासून पाहिजे असलेले आरोपी १ ) किशोर प्रकाश कौरे , २ ) बाबु उर्फ बाबुराव बळीराम टेकाळे , ३ ) जहीर चाँद शेख रा . पाटोदा यांना दिनांक २१/१०/२०२१ रोजी अटक करण्यात आली आहे . एकंदरीत ऑक्टोंबर महिन्यात ( ०८ ) पाहिजे व ( ०१ ) फरार असे एकुण ( ० ९ ) आरोपीतांना पोलीसांनी शिताफिने पकडून अटक करून पुढील कायदेशीर कार्यवाही केलेली आहे . तसेच उर्वरित ( ०५ ) फरार आरोपी मा . न्यायालयात हजर होवून निकाली निघालेले आहेत . तसेच या विशेष मोहिमे अंतर्गत दिनांक १३/०२/२०२१ पासून आज पावेतो पाहिजे ( २७० ) , फरार आरोपी ( ३८ ) , व स्टँडींग वॉरंट ( ०७ ) असे एकुण ( ३१५ ) अटक करून आरोपींताची नावे अभिलेखावरून कमी करण्यात बीड जिल्हा पोलीसांना यश आलेले आहे . सदरची कामगिरी मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बीड , सर्व पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या केलेली आहे .

Exit mobile version