Site icon लोकाशा-बंब न्यूज

झेडपी अध्यक्ष अन् सीईओंनी ग्रा.पं.च्या कर्मचार्‍यांची दिवाळी केली गोड ! 21 शिपायांना प्रमोशन, 1994 पासून कर्तव्य बजावणार्‍यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत घेतले समावून,चार कर्मचारी परिचर तर 17 कर्मचार्‍यांना कनिष्ठ, वरिष्ठ सहाय्यक म्हणून मिळाली नियुक्ती


बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : 1994 पासून ग्राम पंचायतींमध्ये कर्तव्य बजावणार्‍या 21 कर्मचार्‍यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत समावून घेण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट आणि सीईओ अजित पवार यांनी ह्या 21 कर्मचार्‍यांना प्रमोशन देवून त्यांची दिवाळी गोड केली आहे. अध्यक्ष आणि सीईओंच्या याच निर्णयाचे संबंधित कर्मचार्‍यांमधून आभार मानले जात आहेत.
शासनाच्या प्रत्येक योजना शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट आणि सीईओ अजित पवार गतीने काम करीत आहेत. यामुळेच जिल्हा परिषदेमधील महत्वाचे प्रश्‍न खर्‍या अर्थाने मार्गी लागत आहेत. वंचितांना न्याय मिळवून देण्याचे काम तेही स्वत: पुढाकार घेवून करत आहेत. 1994 पासून ग्रामपंचायतींमध्ये उत्कृष्ट पध्दतीने कर्तव्य बजावणार्‍या 21 कर्मचार्‍यांना प्रमोशन देवून अध्यक्ष आणि सीईओंनी त्यांची दिवाळी गोड केली आहे.   ह्या 21 जणांना जिल्हा परिषदेमध्ये समावून घेतल्यामुळे जिल्हा परिषदेतील कामाचा भारही आता बर्‍याच प्रमाणात कमी होणार आहे. या 21 पैकी चार कर्मचार्‍यांची परिचर तर 17 कर्मचार्‍यांची कनिष्ट व वरिष्ठ सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यात आली. या निर्णयाबद्दल आणि नियुक्तीबद्दल अध्यक्ष आणि सीईओंचे अभिनंदन केले जात आहे.

लवकरच झेडपीची तयार होणार वॉररूम, जिल्हास्तरावर 15 तर तालुकास्तरावर प्रत्येकी एका शिक्षकाची होणार नियुक्ती
शासनाची प्रत्येक योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचली पाहिजे, त्या योजनेचा वंचित घटकांना लाभ मिळाला पाहिजे याअनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट आणि सीईओ अजित पवार हे गतीने काम करीत आहेत. शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवणे, संबंधित यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे यासह अन्य गोष्टींसाठी सीईओ अजित पवार हे वॉररूम स्थापन करत आहेत. या रूमच्या माध्यमातूनच जिल्हास्तरावर 15 शिक्षक काम करणार आहेत. तर तालुकास्तरावर प्रत्येकी एक शिक्षक काम पाहणार आहे. याअनुषंगानेच काल पवारांनी मुलाखतीही घेतल्या आहेत.

Exit mobile version