बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : बीड शहरात जीवन प्राधिकरण मार्फत सुरू असलेले काम एक महिन्यात पूर्ण करा असा अल्टीमेट देण्यात आला होता, काम न करणार्या कंत्राटदारला काळ्या यादीत टाका अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता,आता नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या सूचनेवरून 30 नगरसेवकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांना निवेदन दिले असून उपोषणाचा इशारा दिला आहे.
अमृत अभियाना अंतर्गत बीड नगर परिषदेस मलनिस्सारण प्रकल्प व पाणी पुरवठा योजना मंजुर आहेत. सदरील दोन्ही योजनासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बीड यांचे मार्फत तयार करण्यात आला व त्यास सक्षम समितीची मान्यता घेऊन मलनिस्सारण प्रकल्पा करिता रुपये 165.80 कोटीस व पाणी पुरवठा योजना करिता रुपये 114 कोटीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. दोन्ही योजनासाठी कार्यान्वयन यंत्रणा म.जी.प्रा.बीड आहे. शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे सुमारे 210 कि.मी. काम पुर्ण करण्यात आले आहे. सदरील काम करताना रस्ता व नालीचे नुकसान झालेले आहे. ते अद्यापर्यंत दुरुस्त करण्यात आलेले नाही. या बाबत वेळोवेळी बैठका घेऊन सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या बाबत काही अपवाद वगळता रस्ता दुरुस्तीची कामे करण्यात आलेली नाहीत. सदरील कामा बाबत मुख्य अभियंता म.जी.प्रा. औरंगाबाद यांच्या समवेत बैठक व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुनही रस्ता दुरुस्तीची कामे करण्यात आलेली नाहीत. नगर परिषदे मार्फत ग्राहक यादी उपलब्ध करुनही नळ जोडणीची कामे पुर्ण करण्यात आलेली नाहीत या कारणाने विविध मंजुर असलेल्या रस्त्यांची कामे करण्यास अडथळा निर्माण होत आहे.पाणी पुरवठा योजनेच्या कामाची मुदत 24 महिने असतांना हि काम जाणीवपुर्वक काम पुर्ण केले नाही. त्या मुळे नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात वेळो वेळी सर्व स्तरावर बैठका घेऊन सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी अजूनपर्यंत कामात प्रगती नाही. आज पर्यंत 80% काम पुर्ण आहे. मागील 6 महिन्याच्या कामाचा आढावा घेतला असता 3 ते 4% काम झाले आहे. नगर परिषदेने वांरवार पत्र देऊन कंत्राटदारावर दंडात्मक कार्यवाही करावी व अहवाल नगर परिषदेस द्यावा या बाबत मजिप्रास कळविण्यात आले आहे. पंरतु अद्याप पर्यंत वरीष्ठ पातळीवरुन कार्यवाही झालेली नाही, सर्वसाधारण सभा न.प. बीड यांचा ठराव क्रमांक – 37/2019-20 दि. 2/3/2020 दोन्ही ठेकेदारांवर कायदेशिर कार्यवाही करावी असा ठराव मंजुर करण्यात आलेला आहे. भुयारी गटार योजनेस मागील दीड वर्षात फक्त 3 ते 4 % काम झालेला आहेत. या योजनेचे काम अतिशय संथ गतीने दिरंगाईने सुरु आहे व या मध्ये सुध्दा रस्ता दुरुस्तीचे काम केलेले नाही. या दोन्ही योजनावर नगर पालिकेचा कामाबाबतचा व आर्थिक अंकुश नाही. या कारणाने दोन्ही कंत्राटदार कामात दिरंगाई करणे व काम व्यवस्थित न करण्या मुळे बीड शहर वासियांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. व त्याचा रोष नगर परिषदेवर येत आहे. पाणी पुरवठा योजनेचे काम सप्टेंबर अखेर पुर्ण करण्यात येईल असे मुख्य अभियंता यांनी आढावा बैठकीमध्ये ठरवण्यात आले होते परंतु अद्यापर्यंत त्यात कोणतीही प्रगती झालेली नाही. या कारणामुळे दोन्ही योजनांची कंत्राटदार व त्यांना पठीशी घालणारे म.जि.प्रा. यांचे सर्व अधिकारी यांच्या विरुध्द कायदेशिर कार्यवाही करुन दोन्ही कंत्राटदारांना काळ्या यादित टाकण्यात यावेत. उर्वरित योजनेचे काम नोव्हेंबर 2021 अखेर पुर्ण करण्यासाठी आदेश देण्यात यावेत हि विनंती.नसता तिव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवक जाधव भास्कर रामकिसनराव,वाघमारे विष्णु श्यामराव,दुधाळ रत्नमाला बाबुराव,जोगदंड विकास विक्रम,चांदणे सखुबाई रमेश,चव्हाण मिनाबाई रंजितसिंग,मेहरुनिसा बेगम जलीलखान,गुरखुदे जगदिश फुलचंद,काळे सविता राजेंद्,क्षीरसागर भारती राजेश,पिंगळे सुभुद्रा बाजीराव,तांदळे कांताबाई बन्सीधर,पोपळे प्रभाकर जगन्नाथ,शेख मोहम्मद खालेद,वाघचौरे भिमराव मरिबा,विधाते जयश्री विलास,शेख मुखीद रज्जाक,पवार रुपाली सतिश,सय्यद सादेकअली सय्यद मेहबुबअली,सय्यद ईलीयास हमीद,गुंजाळ अश्विनी धर्मराज,गायकवाड संतोष अरुण,वाघमारे गणेश पुजा,कदम रविंद्र कोडिंबा,नाईकवाडे सुशिला नरसिंग,मुळूक विनोद रोहिदास,मोरे सिता भैय्यासाहेब,बन्सोडे रंजित देविदास,धुत शुभम दिलीप,उडान खिराबाई जनार्दन यांनी दिला आहे,पुढच्या आठवडयातच सर्व नगरसेवक उपोषणाला बसतील असाही इशारा देण्यात आला आहे.
अमृत पाणी पुरवठा योजना व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी दिलेला अल्टीमेंट संपला, बीड शहरातील काम पूर्ण न झाल्यामुळे 30 नगरसेवकांचा उपोषणाचा इशारा
