Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडचे परिवहन महामंडळ निघाले थापाडे, आश्‍वासन देवून महिना उलटला तरी पाटोदा-तरडगव्हाण बस सुरू झाली नाही, येत्या आठ दिवसात बस सुरू न केल्यास तिव्र आंदोलन छेडणार : डॉ. मधुसुदन खेडकर यांचा ईशारा


शिरूर, दि. 22 (लोकाशा न्यूज) : बीडचे परिवहन महामंडळ थापाडे निघाले आहे. कारण आश्‍वासन देवून महिना झाला तरी पाटोदा-तरडगव्हाण ही बस अद्याप सुरू झाली नाही, येत्या आठ दिवसात ही बस सुरू झाली नाही तर तिव्र आंदोलन छेडणार असल्याचा ईशारा शिरूर भाजपाचे तालुक्याध्यक्ष डॉ. मधूसुदन खेडकर यांनी दिला आहे.
प्रवाशांच्या अडचणी कमी करण्यासाठी भाजपचे शिरूर कासारचे तालुकाध्यक्ष डॉ. मधूसुदन खेडकर यांच्या एक महत्वाची मागणी बीडच्या परिवहन महामंडळाकडे केली होती. त्यानुसार पाटोदा ते शिरूर-सावरगाव-तिंतरवणी-शिंगारवाडी तरगव्हाण मार्गे चकलांबा ही मुक्कामी बस गणेशविसर्जनानंतर सुरू करू असे आश्‍वासन खेडकर यांना देण्यात आले होते. वास्तविक पाहता या बसमुळे लाखो लोकांच्या प्रवासाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. ही बस सुरू करण्याचे आश्‍वासन दिल्याबद्दलच डॉ. खेडकर यांनी एसटी महामंडळाचे आभार मानले होते. पाटोदा ते शिरूर -सावरगाव -तिंतरवणी-शिंगार वाडी तरडगव्हन मार्गे चकलांबा मुक्कामी गाडी चालू करण्यासंबंधी एसटी विभागीय वाहतूक अधिकारी श्री पडवळ यांच्याकडे भाजपचे शिरूर तालुकाध्यक्ष डॉ. मधुसुदन खेडकर यांनी मागणी केली होती. त्यांची ही मागणी योग्य असुन ही बस गणपती विसर्जनानंतर आम्ही निश्चित चालू करू, असे आश्वासन त्यांना दिले आहे. मात्र अद्याप ही बस सुरू झालेली नाही, येत्या आठ दिवसात  या मार्गाने ही बस सुरू न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट ईशारा डॉ. खेडकर यांनी दिला आहे.

Exit mobile version