Site icon लोकाशा-बंब न्यूज

अन्यथा शेतकऱ्यांसाठी रिपाइं मांत्रालयावर मोर्चा काढणार : पप्पू कागदे,

बीड / प्रतिनिधी
जिल्ह्यातला शेतकरी मुसळधार पावसाने पूर्णताः कोसळला आहे. मात्र राज्य सरकारने आशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत सुरू ठेवावे.आदी मागण्यासाठी मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदशनाखाली महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार (ता.२०) ऑक्टोबर रोजी तीव्र निदर्शन आंदोलन करण्यात आले. दरम्यान राज्य सरकर जनतेचे प्रश्न सोडवितात पूर्णपणे फेल ठरत आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नयेे अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढला जाईल असा इशाराही युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यावेळी दिला.
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करून येथील प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट तात्काळ पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या निकषानुसार आणि याच धरतीवर गायरान धारक शेतकऱ्यांसाठी देखील पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी. बौद्ध,दलीत,मागासर्गीय गोरं गरिबांना मागणी करताच घरकुल ऊपलब्ध करून द्यावे. रमाई घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायतची ठरावाची अट रद्द करण्यात यावी. आदी मागण्या सरकार दरबारी लावून धरल्या आहेत.सरकारने मागण्या तात्काळ मेनी न केल्यास मंत्रालयावर मोर्चा्चा काढला जाईल असा इशाराही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे दिला आहे. यावेळी राजु जोगदंड,किशन तांगडे, मजहर खान,बापु पवार,महेश आठवले,सुभाष तांगडे,अविनाश जोगदंड,अमर विद्यागर,प्रभाकर चांदणे,विलास जोगदंड, भाऊसाहेब कांबळे,प्रा.बाळासाहेब गव्हाणे, भैय्यासाहेब वाघमारे,भास्कर जावळे,राहूल कांबळे,नागेश शिंदे,धम्मा पारवेकर,भैय्यासाहेब मस्के,मिलिंद पोटभरे, लखन वडमारे,सचिन वडमारे,धम्मपाल विद्यागर,बप्पा जावळे, भिमराव घोडेराव,आन्नासाहेब सोनवणे, समाधान गवळी, देवानंद वाघमारे,नवनाथ डोळस, डॉ. सिद्धार्थ वाघमारे, विजय डोळस, विनोद शेजवळ, भाऊसाहेब दळवी,कल्याण सोनवणे,गणेश वाघमारे,चेतन चक्रे,सतीष शिनगारे, राजाभाऊ वक्ते,नितीन जोगदंड,पप्पू वाघमारे,अक्षय कांबळे, सागर पालके, श्रीमंत जाधव,अजय जाधव,अनिकेत कांबळे, बाजीराव वाघमारे, मोहन खेमाडे, सुशील जावळे, राहूल गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात उपस्थित होते.

चौकट
सरकारची अवस्था आंधळं दळतंय अन
कुत्र पीठ खातंय अशी झाली आहे

राज्य सरकाराने राज्याची अतिशय दयनीय अवस्था करून टाकली आहे. सरकाने शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची घोषणा केली मात्र मदत अद्यापही दिली नाही. आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशी अवस्था सरकारची झाली आहे. सरकार पूर्णपणे फेल ठरताना दिसत आहे. असे म्हणत रिपाइंने प्रतिकात्मक पीठ दळायचे जात आणि कुत्र कलेक्टर कचेरीसमोर मांडून सरकारचा निषेध नोंदवला.

Exit mobile version