Site icon लोकाशा-बंब न्यूज

पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू, बीड, गेवराई मधील धक्कादायक घटना

बीड, राक्षसभुवन दि. लोकाशा न्युज
पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत, यातील पहिली घटना पाली येथे घडली असून यामध्ये दोन बालकांचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या घटनेत गेवराईतील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे,
पाण्याचा अंदाज न आल्याने गोदावरी नदीतील डोहात बुडून एका १७ वर्षीय युवकाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला . हि दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील सुरळेगाव याठिकाणी आज मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली . तान्हाजी लिंबाजी आरबड ( वय १७ वर्ष ) रा . सुरळेगाव ता.गेवराई जि . बीड असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे . गेवराई तालुक्यातील सुरळेगाव हे गोदावरी नदीच्या तिरावर वसलेले गाव आहे . दरम्यान आज सकाळी गावातील काही तरुण रोजच्याप्रमाणे नदीत पोहण्यासाठी गेले होते . यावेळी तान्हाजी लिंबाजी आरबड याला नदीच्या एका डोहातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला . हि बाब सोबत असलेल्या तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली . दरम्यान गावातील पट्टीचे पोहणारे शरद भंडारे या तरुणाने सदरील डोहात उडी मारुन तान्हाजीला बाहेर काढले . मात्र तोपर्यंत उशीर झाला होता . तान्हाजीचा डोहात बुडाल्याने दुर्देवी मृत्यू झाला . मयत तान्हाजी हा नेहमी हसतमुख स्वभावाचा आणि आई वडिलाला एकूंता एक मुलगा होता . त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे .
चार महिण्यात आठ जणांचा मृत्यू गोदावरी नदीत बुडून दुर्देवी मृत्यू होत असल्याच्या दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यात सातत्याने होताना दिसत आहेत . तालुक्यात मागील चार महिण्यातच राक्षसभुवन , संगमजळगाव , मिरगाव येथील घडलेल्या दुर्देवी घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे त्यातच आज सुरळेगाव येथे घडलेल्या घटनेत युवकाचा मृत्यू झाला असून या सातत्याने घडणाऱ्या घटना चिंतेचा विषय बनला आहे

Exit mobile version