बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : महिला व जेष्ठ नागरीक सुरक्षा संदर्भात बीड पोलीस, जिल्हा वाहतुक शाखा यांच्याकडून विशेष मोहिमेबाबत बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक आर राजा आणि अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या संकल्पनेतून जिल्हा वाहतूक शाखेतर्फे महिला प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अॅटो रिक्षा व टॅक्स्यांमध्ये आपत्कालीन मदत क्रमांक व अॅटो / टॅक्सी चालकांची माहिती असणारी पत्रके चिटकविण्याच्या मोहिमेस आजपासून प्रारंभ करण्यात आला. सदर मोहिमेंतर्गत बीड जिल्हयातील महत्त्वाचे शहरांमध्ये प्रत्येक परवानाधारक अॅटोमध्ये चिटकिवण्यात येणार्या पत्रकांमध्ये आपत्कालीन पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 , पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 02442 22333 महिला हेल्पलाईन क्रमांक 1091 जेष्ठ नागरीक हेल्पलाईन क्रमांक 1090 , अॅटो चालकाचे नाव , पत्ता, मोबाईल क्रमांक व फोटो इत्यादींचा सामावेष असणार आहे. सदर मोहिमेमध्ये बीड जिल्हयातील प्रत्येक अॅटोमध्ये सदर पत्रके चिटकिवण्याचा उद्देश आहे, ज्यामुळे प्रत्येक प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत पोलीसांची योग्य वेळेत मदत मिळणे सोपे होऊन अप्रिय घटना टाळता येणे शक्य होणार आहे. तरी महिला, मुले व जेष्ठ नागरीकांनी अडचणींच्या काळी सदर सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक आर. राजा यांनी केले आहे.
महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी बीडमध्ये खाकीने हाती घेतली विशेष मोहिम, स्वत: एसपी आणि एएसपी उतरले रस्त्यावर
