बीड : शेतकर्यांच्या नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी बीडमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान खा. प्रीतमताईंही पालकमंत्र्यांसह राज्य सरकारवर मोठा घणाघात केला. राज्य सरकारने अतिवृष्टी बाधितांना सरसकट मदत करणे अपेक्षित होते,परंतु तसे होताना दिसत नाही. अतिवृष्टीच्या अस्मानी संकटाचा सामना करताना शेतकर्यांच्या अन्नधान्याचे नुकसान झाले,पीक उध्वस्त झाली,घरांची पडझड होऊन शेतकरी पूर्णपणे खचला असताना त्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळाले नाही ’ हे आजच्या सत्ताधार्यांच अपयश आहे.जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम करत असताना पंकजाताईंनी प्रत्येक संकटात शेतकर्यांना मदत केली.पंकजाताई बांधावर आल्या म्हणजे मदत नक्की मिळणार असा विश्वास तेंव्हा शेतकर्यांना होता,परंतु आज तो विश्वास आणि ती भावना शेतकर्यांमध्ये दिसत नाही, पंकजाताईंच्या चांगल्या कामामुळे बीड जिल्हा नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिला, आता मात्र राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभारामुळे बीड जिल्ह्याचा खालून एक नंबर आहे, लक्षात ठेवा तुमची ही भ्रष्ट सत्ता उलथून टाकल्याशिवाय पंकजाताई शांत बसणार नाहीत, असे खा. डॉ प्रितमताईंनी आपल्या भाषणात म्हटले.
पीक विमा कंपनी मी मंजूर करून घेतली मात
त्याही वेळी श्रेयासाठी तुम्हीच धावलात