Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजकुमारांचा गुटखा माफियांना दणका, 34 लाखाच्या गुटख्यासह 64 लाखांचा मुद्देमाल पकडला, मांजरसुंब्याजवळील कारवाई


नेकनूर, दि. 13 (लोकाशा न्यूज) : कर्नाटकहून बीडकडे दोन ट्रकमध्ये गुटखा येत असल्याची माहिती डीवायएसपी पंकजकुमार यांना झाल्यानंतर त्यांनी या दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या. या गाड्यांमध्ये तब्बल 34 लाख रूपयांचा गुटखा मिळून आला, या गुटख्याबरोबर दोन ट्रक असा एकूण 64 लाख रूपयांचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आला आहे.
बुधवारी दुपारी मांजरसुंबा मार्गावरून गुटख्याने भरलेल्या दोन ट्रक जात होत्या. या दोन्ही गाड्या डीवायएसपी पंकजकुमार, नेकनूर ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेख मुस्तफा, दीपक खांडेकर, सय्यद अब्दुल, मनोहर अनवणे, राऊत यांनी ताब्यात घेतल्या. या दोन्ही गाड्यात तब्बल 34 लाख रूपयांचा गुटखा आढळून आला. या गाड्या कर्नाटकहून बीडकडे येत होत्या. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुटखा कोणाचा आहे याची माहिती उपलब्ध झालेली नव्हती.

Exit mobile version