Site icon लोकाशा-बंब न्यूज

कोरोनात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या 39 कर्मचार्‍यांच्या पाठीवर झेडपी अध्यक्षांसह सीईओंकडून कौतूकाची थाप, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि सेविकांचा आदर्श पुरस्कारने केला सन्मान


बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : कोरोनात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या जिल्हा परिषदेच्या 39 कर्मचार्‍यांच्या पाठीवर झेडपी अध्यक्ष शिवकन्या सिरसाट आणि सीईओ अजित पवार यांनी कौतूकाची थाप दिली. यावेळी या दोघांच्या हस्ते बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविकांना आदर्श पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट अंगणवाडी सेविका व अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार 2021 प्रदान सोहळा मंगळवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या  सिरसाट, महिला व बाल विकास विभागाच्या सभापती  यशोदाताई  जाधव, सीईओ अजित पवार, शिवाजीराव सिरसाट, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेख रौफ, जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( मबावि ) चंद्रशेखर केकाण यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्तावीक चंद्रशेखर केकाण यांनी केले. त्यानंतर कोव्हीड महामारीत फ्रंट लाईन वर्कर म्हणून कार्य करत असतांना कोव्हीड प्रादुर्भावाने मयत झालेल्या अंगणवाडी सेविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, सभापती यशोदाताई जाधव, सीईओ अजित पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शेख रौफ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी चंद्रशेखर केकाण यांच्या हस्ते एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या 13 प्रकल्पातील 13 अंगणवाडी सेविका व 13 अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. याप्रसंगी सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कक्षातील विस्तार अधिकारी श्री. निंबाळकर ए.जी यांचा कार्य गौरव प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मा . श्री . अजित पवार , मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद बीड यांनी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.ना.सो.शिवकन्या सिरसाट यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व कोव्हीड महामारीत अंगणवाडी सेविकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. नवरात्र पर्वात देवीची शक्ती व मातृ स्वरुपात पुजन केले जाते त्याच प्रमाणे अंगणवाडी ताईने मातृत्वाने अंगणवाडी येणार्‍या बालकांचे काळजी घेते असे नमुद केले. श्री . ए . जी . निंबाळकर, विस्तार अधिकारी (सा.) यांनी उपस्थितांचे आभार मानले. बाल विकास प्रकल्प अधिकार्‍यांमध्ये एस.वाय. तांदळे, आर.एस. मुंडे, एस.एस. थोरात, यु.आर. कांडे, ए.डी. नरसाळे, एम.एस. जायभाय, आर.एस. बुडूख, यु.एन. सानप, एस.बी.लटपटे, व्ही.एल. कदम, जी.ए. दहिवाह, बी.यु. रोडे, व्ही.आर. कराड, जिल्हा कक्ष अधिकारी ए.जी. निंबाळकर यांचा तर एस.बी. ढोले, व्ही.बी.बडे, एस.वाय. साबळे, व्हि.यु. रसाळ, पी.एस. राऊत, एम.पी. ऊरणकर, एस.जे.करंजकर, ए.बी.ससाणे, सी.जे.मुंडे, टि.ए. जमादार, एस.एन.येवले, के.एन. जगताप, एस.जी. घोनसीकर, एस.बी.कदम, जे.व्ही. गवळी, ए.एन. कोटूळे, एस.सी. जाधव, एस.एल. सय्यद, ए.बी. सानप, एन.बी.दुबे, एस.के. शिंदे, ए.एस. वायबसे, एस.घोळवे, जी.एम. पन्हाळकर, एस.बी.कोथीबिरे, एम.आर. दहीफळे यांचा सन्मान करण्यात आला आहे.

Exit mobile version