बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : बीड नगर परिषदेच्या बेशीस्त कारभारामुळे बीड शहरातील नागरीक प्रचंड यातना भोगत आहेत. शहराची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ते, नाली, स्वच्छता, लाईट या सारख्या मुलभुत नागरी सुवीधा उपलब्ध करुन देण्यात नगर पालीका प्रशासन असमर्थ ठरले दुष्काळा असो किंवा ओला दुष्काळ बीड करांना किमान पंधरा दिवसाला पीण्याचे अस्वच्छ पाणी मिळते. नागरीकांच्या हीतासाठी नगरपालीका प्रशासन काडीचेही काम करत नाही. नगरपालीकेतील भोंगळ कारभारामुळे बीड शहराला बकाल अवस्था आली असुन नागरीकांचे आरोग्य कायम धोक्यात आहे. नगरपालीकेतील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आगामी होऊ घातलेल्या नगरपालीकेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टी सर्व ताकतीनीशी उतरेल. नगरपालीकेवर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकवण्यासाठी लढा देणार, असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के आणि भाजपाचे जिल्हा सरचटणीस ऍड.सर्जेराव तांदळे यांनी व्यक्त केला. आगामी नगरपालीकेची निवडणूक लक्षात घेऊन सोमवारी सायंकाळी बीड शहर भाजपाचे नुतन शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी काल आयोजित केली होती या बैठकीस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थितीत होते.
या महत्वपुर्ण बैठकीसाठी संघटन सरचिटणीस प्रा.देविदास नागरगोजे, विक्रात हाजारी, सलीम जहागिर, नवनाथ शिराळे, सुभाष धस, तालुका अध्यक्ष, स्वप्नील गलधर, जगदीश गुरखुदे, डॉ.लक्ष्मण जाधव, अजय सवाई, चंद्रकांत फड, दिपक थोरात, यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. बैठकीस मार्गदर्शन करताना राजेंद्र मस्के यांनी आगामी नगर परिषदेची निवडणूक ताकतीने लढवायची आसून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे अवाहन केले तर ऍड.सर्जेराव तांदळे यांनी भाजपाचे सरकार राज्यात असतांना लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंढे यांनी कोट्यवधीचा निधी दिला परंतु क्षिरसागर घराण्याने तो वाटुन खाल्ला. त्यामुळे येणार्या निवडणूकित भाजपाचाच झेंडा आणि दांडा नगर परिषदेवर रोवू असे विचार मांडले. तर बीड शहरातील रस्ते, वीज या महत्वाच्या समस्या सुद्धा क्षिरसागरांना सोडवता आल्या नाहीत. त्यामुळे बीड शहरातील जनता पर्याय शोधत आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आसे आवाहन केले आहे. याप्रसंगी सलिम जहांगिर, सुभाष धस, नवनाथ शिराळे, स्वप्नील गलधर, विक्रांत हजारी, अजय सवाई, लक्क्ष्मण जाधव, दिपक थोरात, चंद्रकांत फड, किशोर गिराम, सचिन ऊबाळे यांनी आपले विचार मांडले. यांची बैठकीचे प्रस्तावित भगीरथ बियाणी यांनी केले तर सुत्रसंचल संगिताताई धसे यांनी केले. यावेळी अनिल चांदणे, शेखर महाव्दार, उज्ज्वल कोटेचा, संजय लकडे, पालसिंगणकर, विलास बामणे, हरीष खाडे, भुषण पवार, प्रमोद रामदासी, मुसा खान, अड्डोभाई, बाळुकाका सिकची, देवा नलावडे गोलुभाई, दत्ता परळकर, बाबुलाल ढोरमारे, छायाताई मिसाळ, संध्याताई राजपुत, शितलताई राजपुत, लताताई मस्के, अनिता जाधव, लता राऊत, संजिवणी राऊत, रूईकर ताई, सलमा पठान भाभी, ड.राम दहीवाळ, ड.बुंदेले, विजय देशमुख, किरण देशपांडे, अंबादासजी जाधव, नुरलाला, किशोर यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश चरखा, आकाश घोरपडे, शेख अमन, ऋषी फुंदे, किशोर साठे, मनोज पाबळे, सुनिल भडांगे, पवन विर, यश कसबे, अनिकेत यांनी अथक परिश्रम घेतले.
भाजप बीड नगर पालिकेची निवडणूक ताकतीने लढणार, कोणत्याही परिस्थितीत पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवूच, बीड शहर भाजपाच्या बैठकीत मस्के, तांदळेंनी दिला विश्वास
