आष्टी, दि. 12 (लोकाशा न्यूज) : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत भगवान बाबांच्या जन्मगावी मोठ्या उत्साहात दसरा मेळावा साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याची तयारी गतीने सुरू आहे. याठिकाणी सुरू असलेल्या कामाची मंगळवारी खा. प्रीतमताई मुंडे यांनी सावरगावात जावून पाहणी केली, तसेच संबंधित यंत्रणेला काही सुचनाही केल्या. यावेळी खा. प्रीतमताई भगवान बाबांच्या मुर्तीसमोर नतमस्तकही झाल्या. दरम्यान याही वर्षी याच ठिकाणी ऐतिहासिक मेळावा पार पडणार आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यात पंकजाताई नेमक्या काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा त्यांच्या निधनानंतर पंकजाताई मुंडे यांनी पुढे सुरू केली आहे. पुर्वी भगवान गडावर होणारा दसरा मेळावा गेल्या चार वर्षांपासून संत भगवान बाबा यांचे जन्म गाव सावरगाव येथे पर पडत आहे. सावरगाव येथे संत भगवान बाबांचे भव्य स्मारक उभारून भगवान भक्तीगड असे नावकरण करून येथुन दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजाताई मुडे भगवान भक्तांना आणि गोपीनाथ मुंडे यांच्या चहात्यांना संबोधित करतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे दसरा मेळावा ऑनलाईन घेण्यात आला होता. यावर्षी कोरोनाचे सावट कमी झाल्याने भगवान भक्तीगडावर प्रत्यक्ष दसरा मेळावा होणार असुन, दसरा मेळाव्याची गावकर्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्या पंकजाताई मुंडे काय बोलणार याकडे सामान्य जनता आणि राजकिय नेत्यांचे लक्ष लागले आहे.
येत्या 15 तारखेला भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सावरगाव येथिल नागरीक आपला दसरा, आपली परंपरा’ जपण्यासाठी सज्ज झाले आहेत. सर्व ग्रामस्थ एकजुटीने कामाला लागले आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या राज्यभरात ठिक ठिकाणी बैठका सुरू आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. ती परंपरा पुढे पंकजाताई मुंडे यांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे. मागील चार वर्षांपासून संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव येथे हा दसरा मेळावा होत असून त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने याठिकाणी संत भगवान बाबा यांचे भव्य दिव्य स्मारक उभारून परिसराला भगवान भक्तीगड असे नाव दिले आहे. मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे दसरा मेळावा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला होता.यंदा मात्र कोरोनाचे सावट काही अंशी दूर झाले असून मंदिरे उघडली आहेत, शिवाय सर्व जाहीर कार्यक्रम देखील होत आहेत, त्यामुळे हा मेळावा पुन्हा पहिल्या सारखा पार पडेल अशी दाट शक्यता आहे. हा मेळावा म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम मानला जातो. मेळाव्याच्या व्यासपीठावर अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतात.संत भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडेंना मानणारा मोठा वर्ग दरवर्षी पंकजाताई मुंडे यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो.यावर्षी देखील पंकजा मुंडे ह्या संत भगवान बाबांचे दर्शन घेऊन मेळाव्यास संबोधित करणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागून राहिले आहे.
चौकट
सावरगाव येथे दि. 15 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी येथे जय्यत तयारी सुरू आहे. सुरू असलेल्या कामाचा आढावा खा. प्रितमताई मुंडे यांनी सावरगाव येथिल भगवान भक्तीगडावर येऊन दि. 12 ऑक्टोबर रोजी घेतला. यावेळी येथे सुरू असलेल्या व्यासपीठ आणि लोकांना बसण्यासाठी असलेल्या मैदानासह संत भगवान बाबा यांच्या स्मारकाची पाहणी केली. यावेळी त्याच्या बरोबर जि.प. बीड च्या अध्यक्षा सविताताई गोल्हार, जि. प. सदस्य रामदास बडे, पाटोदा पंचायत समितीचे सभापती काकासाहेब लांबरूड सह ग्रामस्थ उपस्थित होते.
